चरण वाघमारे यांना धक्काबुक्कीनंतर तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:14 PM2018-01-31T23:14:20+5:302018-01-31T23:15:14+5:30

मुख्यमंत्र्यांच्या सभेची पूर्वतयारी पाहण्याकरिता गेलेले आ.चरण वाघमारे यांना डॉ.पंकज कारेमोरे यांनी शाब्दीक वाद घालून धक्काबुक्की केली. यावेळी एका नगरसेवकालाही मारहाण केली.

Stage after stepping Waghmare to step | चरण वाघमारे यांना धक्काबुक्कीनंतर तणाव

चरण वाघमारे यांना धक्काबुक्कीनंतर तणाव

Next
ठळक मुद्देटायर जाळून निषेध : ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांचा ठिय्या

आॅनलाईन लोकमत
तुमसर : मुख्यमंत्र्यांच्या सभेची पूर्वतयारी पाहण्याकरिता गेलेले आ.चरण वाघमारे यांना डॉ.पंकज कारेमोरे यांनी शाब्दीक वाद घालून धक्काबुक्की केली. यावेळी एका नगरसेवकालाही मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद तुमसरात क्षणात उमटले. त्यानंतर भाजपच्या शेकडो कार्यर्त्यांनी तुमसर पोलीस ठाण्याला घेराव घातला. बावनकर चौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान घटनास्थळी डॉ.पंकज कारेमोरे यांना भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. तुमसर शहरात सध्या तणावाची स्थिती आहे.
तुमसर नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रम नगरपरिषदेत बुधवारी दुपारी सुरु होता. कार्यक्रम आटोपून आ.चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व भाजप पदाधिकारी राजेंद्र नगरातील मैदानात मुख्यमंत्र्यांच्या सभेची पूर्वतयारी पाहण्याकरिता गेले. दरम्यान मैदानाच्या शेजारी राहणाºया डॉ.पंकज सुभाषचंद्र कारेमोरे हे तिथे आले. डॉ.कारेमोरे यांनी आ.चरण वाघमारे यांचेशी शाब्दीक वाद घालून धक्काबुक्की केली. दरम्यान नगरसेवक श्याम धुर्वे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉ.कारेमोरे यांनी त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर आ.वाघमारे व भाजप कार्यकर्ते तुमसर पोलीस ठाण्यात दाखल झाले. डॉ.पंकज कारेमोरे यांना तुमसर पोलिसांनी तुमसर पोलीस ठाण्यात घेऊन आले. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांत रोष वाढला. ठाण्यात डॉ.कारेमोरे यांना भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा मारहाण केली.
आ.चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपाध्यक्ष कांचन कोडवानी, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर बावनकर चौकात धरणे आंदोलन सुरु झाले. चौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. पुन्हा रात्री ८ वाजता शेकडो भाजप कार्यकर्ते तुमसर पोलीस ठाण्यात परत गेले. शेकडोंचा जमाव शहरात जत्थ्याने गोळा झाला होता. तुमसर शहरात सध्या तणावसदृष्य स्थिती असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता भंडारा तथा इतर ठिकाणाहून पोलीस कुमक बोलाविण्यात आली. डॉ.पंकज कारेमोरे हे माजी आ.सुभाषचंद्र कारेमोरे यांचे पुत्र आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री दि. ४ फेब्रुवारी रोजी तुमसरात सभेकरिता येत आहेत हे विशेष. घटनेनंतर आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली.

Web Title: Stage after stepping Waghmare to step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.