जिल्हा कचेरीत प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 10:21 PM2018-10-09T22:21:38+5:302018-10-09T22:21:59+5:30

गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ करण्यात आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून पीक नष्ट झाले आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा कचेरीतील पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कक्षात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. परंतु अधिकाऱ्यांच्या उत्तरावर प्रकल्प ग्रस्त अधिकच संतप्त झाले.

Stage of project affected in district office | जिल्हा कचेरीत प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या

जिल्हा कचेरीत प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देगोसेखुर्द प्रकल्प : पातळी वाढविल्याने शेतात शिरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ करण्यात आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून पीक नष्ट झाले आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा कचेरीतील पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कक्षात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. परंतु अधिकाऱ्यांच्या उत्तरावर प्रकल्प ग्रस्त अधिकच संतप्त झाले.
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुर्णत: पुनर्वसन व्हायचे आहे. असे असतांना या प्रकल्पात २४३.५०० मिटरपर्यंत जलसाठी वाढविण्यात आला. परिणामी अनेक गावांचे मुख्य रस्ते शेतीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली आले.
तसेच संपादीत न केलेल्या शेतजमिनीवरील पीकही पाण्याखाली येऊन उध्वस्त झाले आहे. चुकीच्या तांत्रिक सर्व्हेक्षणामुळे झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी सोमवारी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन अधिकाऱ्याच्या कक्षात धडकले. त्यांनी याबाबत जाब विचारला असता, उपजिल्हाधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी करीत ठिय्या आंदोलन सुरु केले.
या आंदोलनात प्रहार गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे यशवंत टिचकुले, भाऊ कातोरे, वाल्मीक नागपुरे, रोहित साठवणे, मंगेश वंजारी, रुपेश आथिलकर, गणेश आग्रे, बबलु वाघमारे, वसंता पडोळे, कैलाश अहिरकर, विनोद शेंडे, वासुदेव तुमसरे, चेतन राघोर्ते, विनोद वंजारी, संगित गजभिये, शारदा बन्सोड, लिलाबाई पंधरे, रामप्रसाद ढेंगे, ताराचंद आंबागडे, महादेव आंबागडे, नामदेव खोब्रागडे, वसंता हजारे, राजु कासवकर, प्रकाश उईके, मारोती हासगुडे, प्रभु मेश्राम, यमराज कांबळी, विष्णु मेश्राम, विठ्ठल कांबळे, सचिन ठेकल, आसाराम तलमले, दिपक मोहरकर, वंदना मेश्राम, रामहरिश शेंडे, पंडीत मेश्राम, एजाज अली आदी उपस्थित होते.

Web Title: Stage of project affected in district office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.