कृषीवर आधारित उद्योग सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:30 PM2017-10-25T23:30:09+5:302017-10-25T23:30:19+5:30
बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने भंडारा व पवनी या दोन तालुक्यात कृषीवर आधारीत उद्योग सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने भंडारा व पवनी या दोन तालुक्यात कृषीवर आधारीत उद्योग सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. याबाबत भोंडेकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मुंबई येथे निवेदन दिले. याप्रसंगी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्याक्ष अभ्यंकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पवनी शहर आणि तालुक्याचा सर्वांगिण विकास व्हावा, येथील तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीने नरेंद्र भोंडेकर यांनी ते आमदार असताना वर्ष २०१२ मध्ये पवनी तालुक्यात एमआयडीसीला मंजूरी मिळवून दिली होती. मात्र, नंतरच्या काळात येथे उद्योगांची उभारणी झाली नाही. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या विकासासाठी एमआयडीसी पवनी येथे भात क्लस्टरला जागा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने शासनाकडे लावून धरली आहे.
भंडारा तालुक्यासाठी गडेगाव येथे एमआयडीसी असली तरी पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी, नवीन उद्योग उभारण्यास अडचणी येत आहेत. त्याकरिता भंडारा तालुक्यासाठी २०० एकर क्षेत्राची नवीन एमआयडीसी निर्माण करून आॅटो हबला मंजूरी प्रदान करण्यात यावी, उद्योगांची उभारणी करण्यासाठी महेंद्रा अॅन्ड महेंद्रा, अशोक लेलॅन्ड, सनफ्लॅग, बजाज, होंडा, सीएट, एमआरएफ यासारख्या कंपन्यांना निमंत्रण देण्यात यावे, आदी मागण्या माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे या भेटीदरम्यान केली. भंडारा आणि पवनी तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी राज्य सरकार प्रयत्न आणि सर्वतोपरी सहकार्य करणार असून, भात क्लस्टरला जागा दिली जाईल, एमआयडीसीकरिता अतिरिक्त जागा देऊन मोठ्या कंपन्यांनी येथे उद्योग उभारावे यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उद्योग उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिले.