सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थाने सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:37+5:302021-02-05T08:42:37+5:30
शिक्षण हे माणसाला सज्ञान बनविते त्यामुळे सर्वांगीण शिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात तरतूद केली आहे. ...
शिक्षण हे माणसाला सज्ञान बनविते त्यामुळे सर्वांगीण शिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात तरतूद केली आहे. त्यानुसार प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक , अभियांत्रिकी,वैद्यकीय यासारख्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची शासकीय तसेच
खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व सुरू असताना मात्र मार्च २०२० पासून कोरोना कोविड १९ या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने देशातील व राज्यातील सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थाने बंद करण्यात आले आहेत. सध्या इयत्ता नववी,दहावी, अकरावी, व बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. परंतु इतर वर्ग केव्हा सुरू होणार ही चिंता विद्यार्थी व पालकांना लागली आहे.
विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागत असून विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनवर विपरित परिणाम होत असून विद्यार्थी उनाडपने वागत असल्याची दस्तूर खुद्द पालकांची ओरड आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी,शेतकाम तसेच मोलमजुरी करण्यात व्यस्त असून त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत आहे. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.
व्यावसायिक ,तांत्रिक पदवी ,पदव्युत्तर अभ्यासक्र थर्ड वर्षाच्या परीक्षा केव्हा होणार असा प्रश्न पडला असून सदर वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार करून एक विशेष बाब म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थाने तत्काळ सुरू करणारा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी भीम शक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे एस. के वैद्य बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे ,माधव बोरकर ,हर्ष वर्धन, हुं म ने धनराज तिरपुडे, नरेंद्र कांबळे , कोमल कांबळे रतन मेश्राम, नंदू वाघमारे तोताराम दहिवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, शांताराम खोब्रागडे, फाल्गुन वंजारी,रूपा मेश्राम,दामोधर उके,नत्थु सूर्यवंशी उमाकांत काणेकर, अविनाश खोब्रागडे, यश जयपाल, रामटेके यशवंत घरडे, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, अविनाश बोरकर, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभूर्णे, उमाकांत काणेकर,यांनी एका लेखी निवेदनातून केली आहे.