जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 09:45 PM2018-03-16T21:45:12+5:302018-03-16T21:45:12+5:30

जिल्हयात जलजागृती सप्ताहाचे आयोजन १६ ते २२ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ आज भंडाराचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्या हस्ते जलपूजन करुन करण्यात आला.

Start of awareness in the district for the Week | जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाला प्रारंभ

जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाला प्रारंभ

Next
ठळक मुद्देपाणी अडवा, पाणी जिरवा : सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हयात जलजागृती सप्ताहाचे आयोजन १६ ते २२ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ आज भंडाराचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्या हस्ते जलपूजन करुन करण्यात आला.
यावेळी जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता प्र. रा. नार्वेकर, सिंचन आयोगाचे माजी सदस्य उल्हास फडके, कार्यकारी अभियंता मेंढे, रहाणे, वैद्य, क्रीडा अधिकारी चौधरी उपस्थित होते.
सुनिल मेंढे म्हणाले, आज पाण्याचे दूर्भिक्ष वाढत आहे. पाण्याची पातळी खोल जात आहे. नागरिकांनी पाण्याची बचत करावी. पावसाचे पाणी मुबलक असलेल्या देशात आज पाणी बचतीसाठी जलसप्ताहाचे आयोजन करावे लागत आहे. ही गंभीर बाब आहे. पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणी बचत करा, पाणी अडवा, पाणी जिरवा, असे आवाहन त्यांनी केले.
उल्हास फडके यांनी पाण्याची पौराणिक महत्व पटवून देतांना सांगितले की, पाण्याचे महत्व आपल्या सणउत्सवातून घडत होते. पाणी बचतीचे उपाय शोधून पाणी वापराबाबत सवयी लावून घ्यावी, असे ते म्हणाले. प्रास्ताविकात नार्वेकर यांनी जलजागृती सप्ताहाबाबत माहिती दिली. प्रारंभी नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांचे हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच पाणी बचतीबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. मनोज दाढी यांच्या चमून पाणी बचतीबाबत पथनाटय सादर केले. वैनगंगा नदीघाट ते खामतलाव शितलामाता मंदिर दरम्यान मोटर सायकल रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मनोज दाढी यांनी केले.
१७ मार्चला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभात फेरी, लाभधारक शेतकरी मेळावा, महिला मेळावा, चित्रकला स्पर्धा, प्रबोधन, पथनाटय व जलप्रतिज्ञा असे विविध कार्यक्रम होणार आहे. २१ मार्चला सकाळी ७ वाजता मुलेमुली, शासकीय अधिकारी, कर्मचारी तथा नागरिकांसाठी खामतलाव पासून शास्त्री चौक, गांधी चौक, पोस्ट आॅफीस, मुस्लीम लायब्ररी चौक, शितला माता मंदिर ते खामतलाव अशी वॉटर रन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
२२ मार्चला सकाळी ७.३० ते ८.३० वाजेपर्यंत गांधी चौक ते स्टेडियम प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता जलप्रतिज्ञा कार्यक्रम, दुपारी ३ वाजता समाजिक न्याय भवन येथे शेतकरी व महिला मेळावा, बक्षीस वितरण होईल. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार डॉ. परिणय फुके, रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, राजेश काशिवार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. उल्हास फडके राहणार असून प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी , नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सदस्य तालुका विस्तार अधिकारी यांची राहणार आहे.

Web Title: Start of awareness in the district for the Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.