कोंढा येथे धान खरेदी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:49+5:302021-02-10T04:35:49+5:30
कोंढा-कोसरा: कोंढा परिसरातील गावाचे आधारभूत धान खरेदी केंद्र १२ किमी लांब गोसे येथील वसाहतीत सुरू आहे. तेथे सर्व ...
कोंढा-कोसरा: कोंढा परिसरातील गावाचे आधारभूत धान खरेदी केंद्र १२ किमी लांब गोसे येथील वसाहतीत सुरू आहे. तेथे सर्व गोडाऊन पूर्ण भरले असून, बंद पडलेली खरेदी सध्या उघड्यावर धान ठेवून सुरू आहे. तेव्हा पवनी तालुका शिवसेनातर्फे तहसीलदार पवनी यांना निवेदन देऊन ते केंद्र तत्काळ बंद करून लोकांच्या सोयीचे म्हणून कोंढा येथील सरकारी जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
कोंढा केंद्रावर २ हजार टोकण शेतकऱ्यांना दिले आहेत, अनेक दिवस गोडाऊन पूर्ण भरले, म्हणून १५ दिवसांपासून खरेदी बंद होती. सध्या खुल्या जागेत धान मोजणी सुरू आहे, पण या केंद्रावर धान नेण्यासाठी विनाकारण वाहतूक खर्च लागत आहे. त्यामुळे ते परवडणारे नाही, धान मोजणी खुल्या जागेत करावयाची आहे, तर ती कोंढा येथे सरकारी जागेत प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या जागेत केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त येणारा वाहतूक खर्च लागणार नाही, तेव्हा खुल्या जागेत मोजणी करावयाची आहे, तर ते कोंढा येथे करावी, अशी मागणी पवनी तालुका शिवसेना प्रमुख विजय काटेखाये याच्या शिष्टमंडळाने तहसीलदार नीलिमा रंगारी यांच्याकडे केली. यावेळी आशिष माटे, बाळू बाळबुद्धे, नामदेव सुरकर, डॉ.अनिल धकाते, वसंता गथांंळे, प्रिंतेस रोकडे आदी उपस्थित होते.