महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरु करा
By admin | Published: April 19, 2017 12:28 AM2017-04-19T00:28:31+5:302017-04-19T00:28:31+5:30
भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील अनेक खेड्यातून तसेच मध्यप्रदेशाची सीमा जिल्ह्याला लागून असल्याने ...
मुख्यमंत्र्यांना निवेदन : सेवाभावी संस्थेचा पुढाकार
भंडारा : भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील अनेक खेड्यातून तसेच मध्यप्रदेशाची सीमा जिल्ह्याला लागून असल्याने बालाघाट आदी जिल्ह्यातील गरीब नागरिक येथे औषधोपचारासाठी येतात. त्यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे येथे महिला रूग्णालयाची गरज असून त्याचे बांधकाम त्वरीत सुरू करण्याची मागणी आहे.
जिल्ह्यात महिला रुग्णालय नसल्याने महिला रुग्णालय असणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत जिल्ह्यात अनेकदा आंदोलने झालेली आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून भंडारा जिल्ह्यात महिला रुग्णालय व्हावे म्हणून शासनाने ते मंजूर सुद्धा केलेले आहे व याकरिता जवळपास ४२ कोटी रुपयाची तरतूद झाल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु अजूनपर्यंत या रूग्णालयाची मुहूर्तमेढ झाली नाही. महिला रुग्णालयाची स्वतंत्र व्यवस्था होण्याच्या दृष्टीने शासकीय कारवाई करून महिला रूग्णालयाचे बांधकाम त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी आहे. निवेदन देताना अॅड. आनंदराव वंजारी, के. एन. नान्हे, अर्जुन सूर्यवंशी, प्रेमलाल लांजेवार, वासुदेव नेवारे, गोविंदराव चरडे, दामोधर क्षीरसागर, डॉ.रमेश व्यवहारे, प्रा. मोहोकर, अभिजीत वंजारी, जाधोराव साठवणे, डॉ.मस्के, रेणूका धकाते, स्मिता भांगे अनिता बोरकर, सरिता राठोड, सुषमा उमाळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)