जीपीएफचे खाते सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:33 PM2018-06-19T22:33:44+5:302018-06-19T22:33:53+5:30

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी उच्च न्यायालयातून अंतरीम आदेश प्राप्त कर्मचाऱ्यांचे जीपीएफ खाते सुरु करण्यासंदर्भात भंडारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात वेतन पथकाचे अधीक्षक यांना घेराव देत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघाच्या इतर तालुक्यातील पदाधिकारीही उपस्थित होते.

Start a GPF account | जीपीएफचे खाते सुरु करा

जीपीएफचे खाते सुरु करा

Next
ठळक मुद्देशिक्षकेत्तर कर्मचारी संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी उच्च न्यायालयातून अंतरीम आदेश प्राप्त कर्मचाऱ्यांचे जीपीएफ खाते सुरु करण्यासंदर्भात भंडारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात वेतन पथकाचे अधीक्षक यांना घेराव देत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघाच्या इतर तालुक्यातील पदाधिकारीही उपस्थित होते.
एकुण ६८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे भविष्य व निधी खाते पूर्ववत सुरु ठेवावे, मागील कपातीच्या जीपीएफ पावत्या व मासिक पगार महिन्याच्या एक तारखेला देण्यात यावे या दोन प्रमुख मागण्या संघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांना घेऊन वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक मेश्राम यांना शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी घेराव घातला. यावेळी अधीक्षकांनी दोन दिवसात मागण्या मान्य करणार असे आश्वासन शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या शिष्टमंडळांना दिले.
यावेळी निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सैनपाल वासनिक, जिल्हा कार्याध्यक्ष संजय ब्राम्हणकर, ऋषीकेश डोंगरे, गंगाधर भदाडे, संदीप सेलोकर, संजय मोहतुरे, अशोक शंभरकर, बबन निखारे, बाबूराव मांढरे, पी.एस. मुंगुसमारे, ओ.एन. घरत, मु.एस. कापगते, राजू निंबार्ते, कुंदा बोदलकर तसेच अन्य तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Start a GPF account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.