दहेगाव येथील कायनामाईट माईन्स सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:33+5:302021-07-05T04:22:33+5:30
लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथे १९६९ पासून महाराष्ट्र मिनरल्स काॅर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून कायनाईट माईन्स सुरळीत चालू होती. सदर माईन्समध्ये ...
लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथे १९६९ पासून महाराष्ट्र मिनरल्स काॅर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून कायनाईट माईन्स सुरळीत चालू होती. सदर माईन्समध्ये २० ते २५ गावांतील जवळपास तीन हजार नागरिकांना मजुरीकाम मिळत होते. मात्र एमएमसी कंपनी गत १९९०-९१ मध्ये बंद पडल्याने तब्बल तीन हजार नागरिकांच्या हातातील काम बंद पडले.
मजुरांच्या हातातील काम बंद पडल्याने या परिसरातील नागरिकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. हाताला काम नसल्याने बेरोजगारीचे प्रमाणदेखील वाढले आहे. या कंपनीत काम करणाऱ्या मजुरांचे जवळपास पाच ते सहा महिन्यांपासूनचे वेतन अजूनपर्यंत थकीत असून, दहेगाव येथील पहाडीतून काढलेला कायनाईटही तसाच पडलेला आहे.
सदर कायनाईट माईन्स पूर्ववत सुरू होण्याकरिता बऱ्याचदा पाठपुरावा केला असताना यश आले नसल्याचे नमूद करीत गत वर्षभरापूर्वी परिसरातील तब्बल २७ ग्रामपंचायत कार्यालय आणि ठराव मंजूर करून कायनाईट माईन्स पूर्ववत सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली.
परिसरातील बेरोजगार झालेल्या जनतेला हाताला काम मिळण्यासाठी तालुक्यातील दहेगाव येथील कायनाईट माईन्स पूर्ववत सुरू करा, अन्यथा तालुकाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आली आहे.
040721\img-20210703-wa0086.jpg
रस्त्याच्या कडेला असलेला कायनाईट