त्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ परिचारिकांना तातडीने मानधन सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:42+5:302021-05-30T04:27:42+5:30
कोरोना संसर्गामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. सदर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर कामाचा ...
कोरोना संसर्गामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. सदर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर कामाचा ताण अधिकच वाढला होता. गतवर्षी शासनाकडून संबंधित महाविद्यालयांसाठी मदत मागण्यात आली होती. त्यात या तिन्ही प्रयोगशाळा तंत्रज्ञ परिचारिकांची नेमणूक करण्यात आली; परंतु, अद्यापही शासन व प्रशासनाकडून त्यांना कुठल्याही प्रकारचे मानधन मिळत नसल्यामुळे त्या परिचारिकांवर आर्थिक संकट उद्भवले आहे. त्या तिन्ही तरुणींनी एकत्रित येऊन शिवसेनेकडे मानधन मिळवून देण्यासाठी अर्ज सादर केला आहे. सदर पत्राच्या अनुषंगाने रुग्णसेवा देणाऱ्या परिचारिकांना तातडीने मानधन मिळावे यासाठी शिवसेनेच्या वतीने राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना या प्रकरणी निवेदन पाठविण्यात आले आहे. याबाबत आरोग्य उपसंचालक नागपूर विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा व जिल्हा आरोग्याधिकारी, भंडारा यांना सदर पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच. मेश्राम, निखिल कटारे, निशांत ताजने, धम्मदीप सूर्यवंशी, हर्षल ताजने, कांचन साकुरे, पल्लवी रंगारी, रागिणी सिंदपुरे उपस्थित होते.