घोडायात्रेची जय्यत तयारी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:18 PM2018-03-13T23:18:32+5:302018-03-13T23:18:32+5:30

विदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या घोडायात्रेची जय्यत तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. अड्याळ येथील जागृत हनुमंत देवस्थानात दरवर्षी चैत्रनवरात्री दिवसात भव्य दिव्य भक्तीमय सोहळा मोठ्या आनंदात पार पडतो.

Start the preparations for horse ride | घोडायात्रेची जय्यत तयारी सुरु

घोडायात्रेची जय्यत तयारी सुरु

Next
ठळक मुद्देअड्याळ येथे उसळणार जनसागर : श्रीरामनवमी, हनुमान जयंती, सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा

विशाल रणदिवे ।
आॅनलाईन लोकमत
अड्याळ : विदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या घोडायात्रेची जय्यत तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे.
अड्याळ येथील जागृत हनुमंत देवस्थानात दरवर्षी चैत्रनवरात्री दिवसात भव्य दिव्य भक्तीमय सोहळा मोठ्या आनंदात पार पडतो. यात सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमासोबतच शैक्षणिक आणि समाजउपयोगी उपक्रम सुद्धा राबविले जातात.यावर्षी १८ मार्च ते ३१ मार्च या पंधरवाड्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांनी केले आहे. त्यात मनोकामना पूर्ती अखंड ज्योती कलश स्थापना, देवी भागवत कथा, अखंड ज्योती कलश यात्रा संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह, श्री रामजन्मोत्सव, हनुमंत जयंती उत्सव, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरलेली सर्वधर्म समभाव सामूहिक विवाह सोहळा व भव्य महाप्रसाद वितरण सोहळा या आनंदमयी भक्तीभाव वातावरणात, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व ग्रामस्वच्छता अभियान सुद्धा दरवर्षी येथील भागवत पंच कमेटी असे समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात.
सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भेटवस्तू मिळणार असल्याचे भागवत पंच कमेटीने सांगितले आहे. यामुळे विवाह नोंदणी सुद्धा सुरु आहे. अखंड ज्योती मनोकामना पूर्ती ज्योती कलशाची मोठ्या उत्साहात नाव नोंदणी सुरु आहे. अड्याळ येथे स्वयंभू जागृत हनुमंत देवस्थानावर आजही भाविक भक्तांची भक्ती भाव दरदिवसाला याच मंदिरात पाहायला मिळते. यातील महत्वाचे म्हणजे नाथ जोगी समाज या पावन दिव्य देवस्थानाला आजही भेट देतात. मागील काळात एका भक्ताने आपलं जीव वाचलं म्हणून मंदिराच्या आवारात लाडू वाटप केले होते. त्याचे कारण म्हणजे श्रद्धा असे म्हणतात की जिथून विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरु होते. अशा बऱ्याच घडलेल्या घटना याच मंदिरात आल्यावर आनंदाश्रू नयनांनी आनंदाने भाविक भक्त मंडळी आजही सांगताना दिसतात. घोडायात्रेची चाहुल लागताच येथील लहान मंडळी पासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्येही एक वेगळाच उत्साह आनंद पाहायला मिळतो. भागवत समितीचे अध्यक्ष डॉ.भैय्यासाहेब क्षीरसागर तथा कार्यकारी अध्यक्ष म्हणून यावर्षी रामकृष्ण कुर्झेकर, उपाध्यक्ष भूषण लांबट, सचिव धनंजय मुलकलवार, कोषाध्यक्ष रिंकू सलूजा, सरपंच जयश्री कुंभलकर, उपसरपंच प्रकाश मानापुरे, प्रभू वंजारी, नितीन वरगंटीवार, शाम चौधरी, नीळकंठ ढवळे आणि समस्त अड्याळ ग्रामवासी यात्रेसाठी सज्ज आहे.

Web Title: Start the preparations for horse ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.