तीन वर्षांपासून रखडलेला भेल प्रकल्प सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:51 AM2018-08-10T00:51:09+5:302018-08-10T00:52:15+5:30
जिल्ह्याचा साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे काम तीन वषार्पासून पूर्णपणे बंद आहे. सौरउर्जा मंत्रालयाकडून ४० टक्के अनुदान न मिळाल्याने भेलच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद आहे. केंद्र सरकारने विदभार्तील पहिला सौर उर्जा प्रकल्प अनुदानअभावी रखडून ठेवला आहे. भेल प्रकल्पाला पर्यावरण संवर्धन येथून वगळण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याचा साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे काम तीन वषार्पासून पूर्णपणे बंद आहे. सौरउर्जा मंत्रालयाकडून ४० टक्के अनुदान न मिळाल्याने भेलच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद आहे. केंद्र सरकारने विदभार्तील पहिला सौर उर्जा प्रकल्प अनुदानअभावी रखडून ठेवला आहे. भेल प्रकल्पाला पर्यावरण संवर्धन येथून वगळण्यात आले आहे. पर्यावरण विषयक सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. पाच हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पावर ५०० कोटी खर्च झालेत. अनेक शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी शेतजमिनी दिले.
भेल प्रकल्प सुरु झाला असता तर बेरोजगारांनाच्या हाताला काम मिळाले असते. जमिनीचे अधिग्रहण कार्यालये, सुरक्षा भिंत याचे काम झाले आहेत. विदभार्चा महत्त्वाकांक्षी भारतातील पहिला सौरउर्जा प्लेटप्रकल्प मेक इन महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षित ठरत आहे. भेल प्रकल्प सुरु झाल्यास जिल्ह्यातील तंत्रशिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणांना रोजगार मिळेल.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विदभार्तील असताना सुद्धा भेल प्रकल्प थंडबस्त्यात आहे. क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रकल्पाच्या कार्यालयात कुणीही अधिकारी राहत नाही. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत हा प्रकल्प रखडला आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्कील डेव्हलप प्रोजेक्टच्या प्रचार होत असताना जिल्ह्यातील भेल प्रकल्प बंद पडलेला आहे.
तीन वषार्पासून रखडलेला भेल प्रकल्पाचा काम सुरु करावे. जेणेकरून भूमिहीन झालेल्या शेतकºयांच्या मुलांना रोजगार मिळेल तथा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असे निवेदन दिवाकर रावते, परिवहन व खारभुमी विकास मंत्री आणि ना. सुभाष देसाई, उद्योग व खनिकरण मंत्री यांच्या मार्फत केंद्रिय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन सादर करताना शिवसेना भंडारा जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित एच. मेश्राम, पंचायत समिती माजी उपसभापती व शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेखर कोतपल्लीवार, लवकुश निर्वाण, युवासेना जिल्हा समन्वयक मनोज चौबे, युवासेना तालुका अधिकारी संजू डाहाके, माजी शहर प्रमुख ओमप्रकाश ठोंबरे, राजू निखाडे, युवराज दाखले, मनोज कपोते सह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.