निसर्गप्रेमी, पर्यटकांसाठी मचाण पर्यटन सुरु करा

By admin | Published: May 30, 2016 12:59 AM2016-05-30T00:59:53+5:302016-05-30T00:59:53+5:30

ज्या - ज्या वेळी चंद्रप्रकाश असेल त्यावेळी रात्रभर त्यांना तिथे बसून पर्यटन व वन्यप्राण्यांचा आनंद घेता येईल.

Start tourism tourism for nature lovers | निसर्गप्रेमी, पर्यटकांसाठी मचाण पर्यटन सुरु करा

निसर्गप्रेमी, पर्यटकांसाठी मचाण पर्यटन सुरु करा

Next

ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्थेची मागणी : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
भंडारा : ज्या - ज्या वेळी चंद्रप्रकाश असेल त्यावेळी रात्रभर त्यांना तिथे बसून पर्यटन व वन्यप्राण्यांचा आनंद घेता येईल. त्यासाठी किमान दोन पर्यटकांसोबत वन विभागाचा एक व्यक्ती असावा. येथे पर्यटन होत नाही तेथे आता या निमित्ताने मचाण पर्यटन केले जावू शकेल आणि वन्य प्राण्यांना त्रासही कमी होईल. पावसाळा सोडून उन्हाळा व हिवाळा या दोन ऋतू मध्ये तो सुरु व्हावा. शासनाने याकडे विचार करून भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही पर्यटक व निसर्गप्रेमी करिता मचाण पर्यटन प्रकल्प सुरु करावा, ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थेतर्फे मागणी करण्यात आली आहे.
निसर्गप्रेमी व सर्वसामान्यांना वर्षातून एकदाच वन्य प्राण्यांचे जवळून दर्शन घेण्याची संधी असते. भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमी व संस्था, एन.जी.ओ. च्या पदाधिकारी व सदस्यांनी वनविभागाच्या सहाय्याने लाभ घेतला.
तुमसर तालुक्यातील अनेक निसर्गरमणीय जलाशयाकाठी वन विभागाने मचाणी बांधून निसर्गप्रेमींना वन्यप्राणी दर्शनाची संधी दिली. आंबागड येथील पर्वतीय, निसर्गरमणीय जलाशय येथे वन विभागाने बांधलेल्या मचाणीवर ग्रीन हेरिटेज पर्यटन व पर्यावरण संस्थेला ही संधी मिळाली. संस्थेचे संस्थापक व पर्यटनप्रेमी मो. सईद शेख यांनी मचाणीवरून वन्यप्राण्यांचे दर्शन घेतले. संध्याकाळच्या वेळी वारा सुटला.
रात्रीला अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे बऱ्याचशा प्राण्यांचे दर्शन घेता आले नाही. रात्री दरम्यान काही काही क्षणी स्वच्छ चंद्रप्रकाशात रानडुकरांचा खुप मोठा कळप, वानर तथा इतर सामान्य प्राणी नजरेस पडले. रात्री ३ वाजता दरम्यान बावनथडी नहराच्या पलिकडून वाघाची डरकाळी ऐकू आली. मागच्या वर्षी या परिसरात वाघ आढळल्याची माहीती होती.
निसर्गरमणीय परिसर, अनेकविध पशुपक्ष्यांचा आवाज आणि बाजूला बांध्यातून डुकरांची धावपळीने संपूर्ण जंगल परिसर जणू गजबजून उठले.
या प्राणी गणना करिता वनविभागाचे एम.एन. माकडे वनक्षेत्राधिकारी नाकाडोंगरी, वी.बी. धुर्वे क्षेत्र सहाय्यक चिचोली, सविता रंगारी बिटरक्षक आंबागड, आर.सी. ठाकरे बिट सहाय्यक आंबागड, कोदाणे बिट रक्षक पवनारा, उगले वनरक्षक पौनारखारी आणि शाहीद खान सचिव सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर यांचे सहकार्य मिळाले. निसर्गप्रेमी व सर्वसामान्यांना वर्षातून केवळ एकदाच वन्य प्राण्यांचे जवळून दर्शन घेण्याची जी संधी दिली जाते. मचाण पर्यटन सुरु करण्यात येणार असल्याची बातमी कळली. भंडारा गोंदिया जिल्ह्यात ही पर्यटक व निसर्गप्रेमी करिता मचाण पर्यटन प्रकल्प राबविण्यात यावे. (प्रतिनिधी)

Web Title: Start tourism tourism for nature lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.