अनेक वर्षांपासून बंद असलेला युनिव्हर्सल फेरो मॅग्निज कारखाना सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 10:04 PM2019-02-10T22:04:35+5:302019-02-10T22:05:06+5:30

अनेक वर्षांपासून बंद असलेला युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज कारखाना सुरु करण्यात यावे, अन्यथा वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा

Start the Universal Ferro Manganese factory for many years | अनेक वर्षांपासून बंद असलेला युनिव्हर्सल फेरो मॅग्निज कारखाना सुरु करा

अनेक वर्षांपासून बंद असलेला युनिव्हर्सल फेरो मॅग्निज कारखाना सुरु करा

Next
ठळक मुद्देउद्योगमंत्र्यांना निवेदन : कारखाना सुरू न झाल्यास वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अनेक वर्षांपासून बंद असलेला युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज कारखाना सुरु करण्यात यावे, अन्यथा वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा
इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
तालुक्यातील माडगी येथे युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना गत १२ वर्षांपासून बंद पडलेला आहे. सुमारे १३०० कामगार बेरोजगार झाले आहेत. माडगी शिवारातील सुपीक जमीनी शेतकºयांना कारखान्याला दिल्या होत्या. ३०० एकरात हा कारखाना आहे. अभय योजनेंतर्गत कारखान्याला अभय देण्यात आले होते, परंतु कारखाना सुरु झाला नाही. मागील ३५ वर्षापासून हा कारखाना सुरु होता. १८ आॅगस्ट २००६ पासून हा कारखाना कायम बंद आहे. या कारखान्यावर सुमारे २०० कोटींचे वीज देयक थकित होते.
यापूर्वी एनटीपीसी येथे सवलतीच्या दरात कारखान्याला वीजपुरवठा करीत होती. सवलतीच्या दरात वीजपुरवठा बंद केल्याने गुंता वाढला होता. वीज वितरण कंपनीने सवलतीच्या दरात विजपुरवठा करण्यास नकार दिला होता. कारखान्याकडे सुरवातीला ५० कोटी रुपये होते. पुढे ती रक्कम वाढून २०० कोटी रुपयापर्यंत गेली होती.
दरम्यान कारखानदाराने १८ आॅगस्ट २००६ मध्ये क्लोजर करण्याचा निर्णय घेतला होता. २७८ कामगारांना क्लोजरची माहिती दिली. दरम्यान कारखाना सुरु राहावा, याकरिता शिवसेना भंडारा जिल्ह्याच्या वतीने मोठे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु त्यास यश मिळाले नाही. मात्र प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली होती.
राज्य शासनाने आजारी कारखान्याकरीता अभय योजना सुरु केली. युनीव्हर्सल (खंबाटा) फेरोने सन २०१४ मध्ये अभय योजनेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कारखान्यावरील वीज बिल निम्मा माफ करण्यात आले होते. कारखानदाराने २०० कोटी पैकी ४८ कोटी रुपये भरले होते. केवळ कारखाना सुरु करण्याच्या अटीवर अभय योजनेचा लाभ मिळेल असा करारनामा करण्यात आला होता. कारखाना सुरु करण्याकरिता तीन वर्षाची वेळ देण्यात आली.
सन २०१७ मध्ये तीन वर्षे लोटले तरी कारखानदाराने कारखाना सुरु केला नाही. कराराचा येथे कारखानदाराने भंग केला आहे. कारखानदाराने कारखाना परिसरातील कोट्यवधी रुपयांचा मॅग्नीजचा साठा कमी करणे सुरु केले होते. ते आताही सुरूच आहे. कारखान्याकडे ३०० एकर सुपीक जमीन पडून आहे. कारखानदाराने कारखाना सुरु करावे, अन्यथा स्थानिक शेतकऱ्यांचे त्या जमीनी परत करावे.
सदर दोन वर्षापूर्वी १ जून २०१६ ला शिवसेना भंडारा जिल्ह्याच्या वतीने युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना सुरु करण्याकरिता भर उन्हामध्ये मोठे आंदोलन केले होते, परंतु प्लांट मालकाने कारखाना सुरु करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेतला नाही. कारखाना सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेण्यात येईल, असे शिवसेना तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी शासनाला इशारा दिलेला आहे.
यावेळी भंडारा जिल्हा शिवसेनेचे अमीत एच. मेश्राम, उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, तालुका प्रमुख प्रकाश लसुंते, शहर प्रमुख नितीन सेलोकर, माजी तालुका प्रमुख नरेश उचिबघले, उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, वामनराव पडोळे, सुरेश राहांगडाले सह पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Start the Universal Ferro Manganese factory for many years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.