गोबरवाही परिसरात रोहयो अंतर्गत कामे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:06 AM2021-02-06T05:06:55+5:302021-02-06T05:06:55+5:30
मागील नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेरगावी गेलेले मजूर आपापल्या गावांत आले असून, त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. ...
मागील नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेरगावी गेलेले मजूर आपापल्या गावांत आले असून, त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीमध्येही कामे नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाला आहे. राज्यात कोरोना संकटानंतर अनेक कंपन्यांनी पाहिजे त्या प्रमाणात मजूरवर्गाला समाविष्ट केले नाही. परिणामी मजुरांना कामासाठी बाहेरगावी परत जाता येत नाही. शेतीची कामे आता संपली असून, गावकऱ्यांकडे हाताला कसलेही काम नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. एकंदरीत कामाअभावी मजुरांची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गोबरवाही परिसरातील गोबरवाही, राजापूर,चिखला, सितासावंगी, खंदाळ गुढरी,हेटी, हमेशा, चिचोली आदी गावात तत्काळ रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी गोबरवाहीचे माजी सरपंच कृष्णकांत बघेल यांनी केली आहे
ReplyReply allForward