जल शुद्धीकरण यंत्रातील दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:25 PM2018-06-15T22:25:21+5:302018-06-15T22:25:21+5:30

एक महिन्यापासून सुरु असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्राम पंचायतीची गावात नाचक्की झाली आहे. विविध स्तरावरून टीकास्त्र सुरु असून गावात नानाविध चर्चांना पेव फुटले आहे.

Starting the repair work in the water purification system | जल शुद्धीकरण यंत्रातील दुरुस्तीचे काम सुरू

जल शुद्धीकरण यंत्रातील दुरुस्तीचे काम सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देशुद्ध पाणीपुरवठा होणार : नागरिकांचा ग्राम पंचायतीवर रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : एक महिन्यापासून सुरु असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्राम पंचायतीची गावात नाचक्की झाली आहे. विविध स्तरावरून टीकास्त्र सुरु असून गावात नानाविध चर्चांना पेव फुटले आहे. याबाबत ग्राम पंचायत प्रशासन खळबळून जागा झाला आहे. शुक्रवार सकाळपासून सरपंच श्वेता येळणे, माजी सरपंच संजय मिरासे व माजी उपसरपंच मनोज सुखानी यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर ठिय्या मांडून आपल्या समक्ष दुरुस्तीचे काम करवून घेतले. य्
ाासाठी सनफ्लॅग कंपनीच्या जल शुद्धीकरण केंद्राचे प्रमुख यांची मदत घेण्यात आली आहे. लवकरच वरठी वासियांना शुद्ध पाणी पुरवठा पुरर्वत सुरु होणार असल्याची ग्वाही सरपंच यांनी ग्रामस्थांना दिली आहे.
वरठी येथे तालुक्यातील एकमेव जल शुद्धीकरण केंद्र आहे. १८ वर्षांपासून गावात फिल्टर पाणी पुरवठा होत आहे. गावातील जीवनवाहिनी म्हणून नळ योजना सुरु होती. एक महिन्यापूर्वी आवश्यकता नसताना चुकीचे नियोजन करून जल शुद्धीकरण यंत्राची दुरुस्ती करण्यात आली. कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन न घेता दुरुस्ती केल्याने यंत्रात बिघाड निर्माण झाला होता. यामुळे एक महिन्यापासून गावातील पाणी पुरवठा प्रभावित झाली होती. एक पाहिण्यापासून नळाला पिवळसर पाणी पुरवठा येत होता. यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबद नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
अनेकदा दुरुस्ती करूनही दूषित पाण्याची समस्या सुटत नसल्याने त्रस्त सरपंच श्वेता येळणे यांनी सकाळपासून जेल शुद्धीकरण केंद्रावर ठिय्या मांडून होत्या. यावेळी माजी सरपंच संजय मिरासे व माजी उपसरपंच मनोज सुखानी, ग्राम पंचायत सदस्य विशाल शेंडे, योगेश हटवार, संघदीप उके, सीमा डोंगरे, मंदा साखरवडे व संगीत बडवाईक ग्राम पंचायत कर्मचाऱ्यासोबत उपस्थित होत्या. जल शुद्धीकरण केंद्रावर उपस्थित राहून सर्वानी आपल्या समक्ष दुरुस्तीचे काम करवून घेतले.
कामाचे चुकीचे नियोजन व तज्ज्ञांचा सल्ला न घेता मानमजीर्ने दुरुस्तीचे काम केल्यामुळे ग्राम पंचायत प्रशासन अडचणीत आले होते. माजी सरपंच संजय मिरासे व मनोज सुखानी यांच्या दीर्घकालीन अनुभवाचा फायदा यावेळी झाला. संजय मिरासे यांची ग्राम पंचायतीची पाचवा कार्यकाळ आहे. त्यामुळे त्यांना पाणी पुरवठा विभागाची इत्थ्यंभूत माहिती आहे.
माजी सरपंच असल्यामुळे त्यांना पाणी टंचाई व जल शुद्धीकरण यंत्राची देखभाल दुरुस्तीचा प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा यावेळी झाला. सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित असल्यामुळे दुरुस्तीच्या कामात होणारी हयगय झाली नाही. सरपंच काम होईपर्यंत तेथून हटल्या नाहीत.
कर्मचाºयांना व्यवस्थित काम करण्याच्या सूचना देण्याबरोबर त्याची आस्थेने चौकशी सुद्धा करीत होत्या. शुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाक्या अतिशय खोल असल्यामुळे कर्मचाºयांना कमालीचा त्रास होताना दिसल्यावर त्यांनी त्यांच्यासाठी पंख्याची व्यवस्था करून दिली. नियोजित काम करताना कर्मचाºयांची देखभाल व आस्थेने वारंवार चौकशी करून त्यांना वेळेवर चहा-नास्ता पुरवण्यावर त्यांचे कटाक्ष लक्ष होते. सायंकाळ पर्यंत जवळपास अध्यार्पेक्षा जास्त काम झाले होते. यामुळे उद्या पासून गावकºयांना शुद्ध पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.
पुन्हा केला हल्ला बोल
दिवसेंदिवस नागरिकाचे पाण्यासाठी बेहाल होत असल्याने आज दुसºया दिवशीही युवकांनी ग्राम पंचायतीवर हल्ला बोल केला. यावेळी त्यांनी दूषित पाण्याबाबद कडक धोरण करण्याचा आग्रह केला. दूषित पाणी पुरवठा होण्यास जबादार पदाधिकारी याना ग्राम पंचायत पाठीशी घालत असल्याचे सांगून कारवाई करण्याची मागणी केली. गावातील पाणी पुरवठा सुरळीत सुरु न झाल्यास ग्राम पंचातील कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते अश्विन मेश्राम यांनी दिले. यावेळी विजय बांडेबुचे, किशोर मारवाडे, प्रदीप भालाधरे, शुभम तिरपुडे, भुपेश शहारे, पंकज वासनिक, निशांत गजभिये उपस्थित होते.

Web Title: Starting the repair work in the water purification system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.