साकोलीच्या स्टेट बँकेत सुविधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:44+5:302021-08-23T04:37:44+5:30
साकोली : येथील शिवाजी वाॅर्डात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत विविध समस्यांचा अंबार निर्माण झाला आहे. साधी पासबुकही प्रिंट होत ...
साकोली : येथील शिवाजी वाॅर्डात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत विविध समस्यांचा अंबार निर्माण झाला आहे. साधी पासबुकही प्रिंट होत नाही. ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी एकमुखी मागणी ग्राहकांनी केली आहे.
ग्राहकांच्या सेवार्थ असलेली स्टेट बँक आता विविध कारणांनी त्रासदायक काऊंटर व ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. ग्राहकांना या काऊंटरवरून दुसऱ्या काऊंटरवर चकरा मारल्याशिवाय कामे होत नाहीत. ‘तुम्हाला तुमचा बॅलन्स सांगितला जाईल, पण पासबुक प्रिंट होणार नाही’ अशी उत्तरे हमखासपणे दिली जातात. विशेष म्हणजे या बँकेच्या शाखेत प्रिंटिंगसाठी काऊंटर आहे. पण संबंधित कर्मचारी सुटीवर असल्याचे सांगण्यात येते. बँकेच्या व्यवस्थापकांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजते. डोकेदुखी थांबविण्यासाठी या समस्येकडे बँक प्रशासन लक्ष देईल काय? असा सवालही ग्राहकांनी उपस्थित केला आहे.