राज्य शासनाने महागाई भत्त्यात वाढ करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:53+5:302021-09-27T04:38:53+5:30
महागाई वाढली की केंद्र सरकार व राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी असा नियम आहे. त्यामुळे ...
महागाई वाढली की केंद्र सरकार व राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी असा नियम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना ११ टक्के महागाई भत्ता लागू केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे ११ टक्के महागाई भत्ता लागू करणे क्रमप्राप्त होते. परंतु माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक तब्बल दोन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अजूनपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू केला नसल्यामुळे महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. निवेदनावर देवेंद्र सोनटक्के, प्रवीण गजभिये, सचिन तिरपुडे, ओमप्रकाश संग्रामे, होमेंद्र कटरे, श्याम वानखेडे, खोमेश्वर टोंगे, ओमप्रकाश धाबेकर, विनोद नवदेवे, सुभाष शेंडे, नाना गजभिये, आर. आर. काळे, अशोक काणेकर, मोहन बोंद्रे, अनाथपाल वैद्य, रितेश वासनिक, प्रशांत कोटरंगे, महेंद्र रहांगडाले, प्रवीण कटरे, हेमराज गोबाडे, नदीम खान, धनंजय बोरकर, चंद्रमणी बागडे, अरुण कांबळे, कल्याणी निखाडे, लीलाधर ढोरे, रियाज काझी, रमेश पांढरकर, स्मिता नहातकर, सुलभा काळे, लीलाधर निखाडे, अरुण पखाले, नितीन सोनवाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.