बार्टीविषयी राज्य शासनाची अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:34+5:302021-09-19T04:36:34+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३०० कोटींपैकी केवळ ९१.५० कोटी रुपये निधी ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३०० कोटींपैकी केवळ ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला. बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्र्यांनी केली असली तरी सहा महिने होऊनही केली गेलेली अल्प तरतूद ही आघाडी सरकारची अनास्था स्पष्ट करीत आहे. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम व भंडारा जिल्ह्याच्या वतीने या दिरंगाईचा निषेध व्यक्त केला आहे. गत सहा महिने बार्टीच्या योजनांची केली जाणारी दुरवस्था पाहता अनुसूचित जातीमध्ये तसेच समाज माध्यमांमध्ये बार्टीच्या योजना बंद पडणार की काय, असा प्रश्न पडला आहे. बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. यापैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, यासाठी सामाजिक न्याय मंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार
असल्याचे मंगेश मेश्राम यांनी सांगितले.