राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:54 AM2019-04-26T00:54:18+5:302019-04-26T00:55:02+5:30

तालुक्यातील लाखनी -लाखोरी- सालेभाटा- मोरगाव राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम ठप्प पडल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. तुमसर- तिरोडा तालुक्यांना जोडणारा सालेभाटा राज्यमहामार्गाचे रुंदीकरणाचे काम शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीद्वारे सुरु आहे.

State Highway Widening Stops | राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम ठप्प

राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम ठप्प

Next
ठळक मुद्देलाखनी-सालेभाटा मार्ग: आवागमन करणाऱ्या नागरिकांना करावा लागतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील लाखनी -लाखोरी- सालेभाटा- मोरगाव राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम ठप्प पडल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. तुमसर- तिरोडा तालुक्यांना जोडणारा सालेभाटा राज्यमहामार्गाचे रुंदीकरणाचे काम शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीद्वारे सुरु आहे. गत सहा ते सात महिण्यापुर्वीपासून राज्यमार्गाचे रुंदीकरणासाठी एका बाजुने खोदकाम केले आहे. एका बाजुने रस्त्याचे खोदकाम केल्याने अरुंद मार्गाने लोकांना जाणे- येणे करावे लागत आहे.
कंपनीचे राज्यमहामार्ग रुंदीकरणाचे काम महिन्याभरापूर्वीपासून ठप्प आहे. रस्त्यावर गिट्टी व माती पसरलेली आहे. मार्गावरुन अवजड वाहने, बसेस धावत असतात तसेच मासलमेटा येथील खेडेपार रोडवरील टेकडीवरुन गिट्टी उत्खननाचे काम जोरात सुरु असल्याने टिप्परची वाहतूक सुरु आहे. अशावेळी सायकलस्वार व दुचाकीस्वारांना अक्षरश: जीव मुठीत घेवून जावे लागते आहे. कंपनीद्वारे धोक्याचा सुचना देणारे बोर्ड लावले नाहीत. तसेच रस्त्यावर दगड पसरलेली आहे. रस्त्यावरुन टिप्पर धावत असतानी धुळ उडत असते. धुळीमुळे समोरचा रस्ता दिसत नाही. या मार्गावर लहानमोठे अपघात नेहमी होत असतात. कंपनीद्वारे राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम जलद गतीने होणे आवश्यक होते. परंतू कामाचा वेग मंदावला आहे. अपूर्ण व सुरक्षिततेचा अभाव येथे दिसून येतो.

शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीला वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. अपुºया कामामुळे व खोदकाम केलेल्या निम्म्या रस्त्यामुळे अपघाताची घटना घडण्याची शक्यता आहे. धुळीमुळे लोकांना त्रास होत असतो. डांबरी रस्त्यावर सुध्दा खड्डे पडलेले आहेत.
- ज्ञानेश्वर रहांगडाले,
जि.प. सदस्य भंडारा
राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम अपूर्ण असल्याने किरकोळ अपघात वाढले आहेत. अनेक विद्यार्थी, व्यावसायीक व इतर जनतेला रोज जाणे-येणे करावे लागते. टिप्पर मालक इतर वाहनांना रस्ता देत नाही.रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. त्याठिकाणी अनेकांच्या सुरक्षिततेचा विचार केला जात नाही.
- मिनाक्षी बोपचे, सरपंच, राजेगाव

Web Title: State Highway Widening Stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.