आदिवासी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आज भंडाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:24 AM2021-07-01T04:24:23+5:302021-07-01T04:24:23+5:30

आदिवासी समाजाच्या नावाखाली व आरक्षणाच्या भरोश्यावर निवडून आलेले २५ आमदार व ४ खासदार आदिवासीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरलेले ...

State President of Tribal Council in Bhandara today | आदिवासी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आज भंडाऱ्यात

आदिवासी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आज भंडाऱ्यात

Next

आदिवासी समाजाच्या नावाखाली व आरक्षणाच्या भरोश्यावर निवडून आलेले २५ आमदार व ४ खासदार आदिवासीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरलेले लोकप्रतिनिधी असल्यामुळे आदिवासी समाजाचे खूप मोठे नुकसान होत आहे. त्यांना यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी व निवडून आलेल्या आदिवासी जनप्रतिनिधींनी समाजासाठी काय केले..? या संदर्भात जाब विचारुन यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यव्यापी जनाधिकार उलगुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यव्यापी आंदोलन यात्रा २२ जून पासून शिवसेनेचे आमदार किरण लहमाटे यांच्या निवासस्थानापासून त्यांच्या गैरहजर असल्या कारणाने काळे झेंडे दाखवून सुरू करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा महाराष्ट्र अध्यक्ष लकीभाऊ जाधव तसेच विदर्भ युवा अध्यक्ष चंद्रशेखर मडावी हे करत आहेत आणि त्यांच्या सोबत शिष्टमंडळा मध्ये राज्याचे अनेक मोठे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: State President of Tribal Council in Bhandara today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.