राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी, शिवशाहीसह ट्रॅव्हल्सचेही प्रवासी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:56+5:302021-06-16T04:46:56+5:30
बॉक्स ट्रॅव्हल्सचे तिकीट तेवढेच, तिकीटवाढ नाही प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि लांब पल्ल्यांच्या एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. यासोबतच अनेक ...
बॉक्स
ट्रॅव्हल्सचे तिकीट तेवढेच, तिकीटवाढ नाही
प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि लांब पल्ल्यांच्या एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. यासोबतच अनेक कंपन्यांच्या ट्रॅव्हल्सही आता सुरू करण्यात आल्या असून तिकीटदरही तेवढेच आहेत. मात्र, तरीही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद वाढलेला दिसून येत नाही. एसटी बसपेक्षा ट्रॅव्हल्सचे तिकीटदर हे जास्त आहेत. मात्र, पूर्वीपेक्षा तिकीटदरात कुठेही वाढ करण्यात आलेले नाही. मात्र पुणे, औरंगाबाद, अकोला, अमरावती, रायपूर, छत्तीसगढ मार्गावर धावणाऱ्या ट्रॅव्हल्सला प्रवाशांचा प्रतिसाद दिसून येत आहे. गत दोन दिवसांत पावसाचे वातावरण असल्यामुळे अनेकजण घराबाहेर पडले नसल्यानेही प्रवासी कमी असल्याचे एका ट्रॅव्हल्स मालकांनी सांगितले.
बॉक्स
नागपूर-भंडारा-तुमसर-नागपूर मार्गावर गर्दी वाढली
भंडारा आगारातर्फे काही दिवसांपूर्वीच नागपूर, अकोला, अमरावती, वणी तसेच जिल्ह्यातील लाखांदूर, पवनी, तुमसर मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. भंडारा-नागपूर मार्गावर शासकीय कर्मचाऱ्यांसह इतरही प्रवासी दररोज वाढले असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोरोना उपाययोजनांचे पालन होत असल्याने एसटीच बरी, असे अनेक प्रवासी म्हणत आहेत.
कोट
कोरोनामुळे एसटी महामंडळाने प्रवासी बसेस वाहतूक बंद ठेवली होती. मात्र, आता प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या बसेस धावू लागल्या आहेत. भंडारा-नागपूर, भंडारा-तुमसर, पवनी-लाखांदूर मार्गांवर प्रवाशांच्या संख्येनुसार विविध आगारांतून बसेस वाढवल्या आहेत. एसटीचा प्रवास हा आजही सुरक्षित असल्यानेच अनेक प्रवाशांचा एसटीकडे कल असल्याने बसेस सॅनिटाइझ नियमितपणे केल्या जातात.
- विजय गिदमारे, वाहतूक निरीक्षक, भंडारा