भरारी सोशल फाउंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:50+5:302021-09-27T04:38:50+5:30
गत २०-२५ वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस तात्पुरत्या मानधनावर सेवा देत आहेत. शासनस्तरावर त्यांच्या कार्याचा व आर्थिक स्रोत वाढविण्याचे ...
गत २०-२५ वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस तात्पुरत्या मानधनावर सेवा देत आहेत. शासनस्तरावर त्यांच्या कार्याचा व आर्थिक स्रोत वाढविण्याचे धोरण आहे. अत्यल्प मानधनामुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होत आहे. महागाईच्या काळात त्यांचे मानधन वाढविण्याची गरज आहे. एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाचे धडे देत असताना त्यांच्याकडून गरजेपेक्षा अधिक काम करवून घेतले जात आहे. गरोदर व उपचार सुरू असलेल्या मातांची आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक पोषण आहार, पोषण व आरोग्य शिक्षण आदी कामे सातत्याने करीत आहेत. या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासनाने नियमानुसार पूर्णवेळ काम द्यावे, शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा, किमान वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, सेवा समाप्तीनंतर त्वरित पेंशन लागू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी भरारी सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.