गणेशपूर क्षेत्रातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:22+5:302021-02-05T08:42:22+5:30

भंडारा : जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन आदर्श युवा मंचतर्फे पालकमंत्री विश्वजित कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले ...

Statement to the Guardian Minister regarding the problems in Ganeshpur area | गणेशपूर क्षेत्रातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

गणेशपूर क्षेत्रातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

Next

भंडारा : जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन आदर्श युवा मंचतर्फे पालकमंत्री विश्वजित कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले .

निवेदनात गणेशपूर येथील पीडित आणि गोसे पीडितअंतर्गत येत असलेल्या आंबेडकर वॉर्ड आणि सुभाष वॉर्डात पुनर्वसन नवीन पट्टे देण्यात यावे, पिंडकेपार पुनर्वसन मुद्दा हा त्वरित मार्गी लावण्यात यावा, बेला येथे नवीन मानव मंदिराचा प्रस्ताव दाखल, दवडीपार / बेला येथील पुनर्वसन त्वरित मार्गी लावावे, कोरंभी देवी या गावाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केलेले असून याच्या गोठा फंड आपल्या स्थानिक निधीतून ठेवून त्याला लवकरात लवकर विकसित करावे. यावरून युवक वर्गांना मोठा रोजगार मिळेल. गणेशपूर ते खात रोड येथील रेल्वे रूळ उठलेली असून तेथून त्वरित नवीन रस्त्याची स्थापना करावी जेणेकरून लोकांना अंतर्भाग क्षेत्रामधून लवकरात लवकर रहदारी करणे सोपे होईल आणि अपघात देखील कमी होतील आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी समक्ष बोलून मागण्यांवर त्वरित कारवाई व्हावी यासाठीदेखील निर्देश दिले. याप्रसंगी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्क, संजू मते, लुकेश जोध, सौरभ साखरकर, स्वप्निल जांभूळकर, पारस वैद्य, अतुल वंजारी आदी उपस्थित होते.

Web Title: Statement to the Guardian Minister regarding the problems in Ganeshpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.