पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:48+5:302021-08-01T04:32:48+5:30
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर जी नृशंस हिंसा करण्यात आली ती हादरवणारी आहे. येथील गुंडांनी ज्या पद्धतीने हल्ले करून निष्पाप ...
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर जी नृशंस हिंसा करण्यात आली ती हादरवणारी आहे. येथील गुंडांनी ज्या पद्धतीने हल्ले करून निष्पाप लोकांचे बळी घेतले, महिलांवर अत्याचार केले, ते अत्यंत निंदनीय असून या हिंसाचारातील अन्यायग्रस्तांना योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण देशात याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता या निवेदनातून वर्तविली आहे. या सततच्या हिंसाचाराच्या घटनांमुळे भयग्रस्त नागरिक आपली घरे सोडून जात आहेत. मात्र, बंगालचे राज्य सरकार येथील हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या अनिल मरसकोल्हे, चंद्रकांत वडीचार, विलास मरसकोल्हे, दुर्योधन सय्याम, आशिष गुप्ता, गोवर्धन कांबळे, जिल्हा संघटनमंत्री संजय मस्के आदी प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांच्याकडे निवेदन सुपुर्द केले.