रायुकाँचे पालांदूरच्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:40 AM2021-08-20T04:40:55+5:302021-08-20T04:40:55+5:30
पालांदूर हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव. आसपासच्या ४० ते ५० लहान खेडे गावासाठी पालांदूर ही मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील ...
पालांदूर हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव. आसपासच्या ४० ते ५० लहान खेडे गावासाठी पालांदूर ही मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील जनता आपले वैद्यकीय उपचार करण्यासाठी पालांदूर येथे येत असतात. कोरोना काळात रुग्णालयासाठी शासनाने पालांदूर ग्रामीण रुग्णालयाला एक्स-रे मशीन कर्मचारी व रुग्णसेवेसाठी इतर साहित्य व सुविधा पुरविल्या, मात्र मागील तीन महिन्यांपासून रुग्णालयात अजूनपर्यंत अद्यावत त्या सुविधांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात आरोग्य विषयक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सोयीसुविधा अभावी काही रुग्णांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र बोंद्रे, माजी जिल्हाध्यक्ष दामाजी खंडाईत, लाखनी तालुका उपाध्यक्ष कापसे, आसिफ पठाण, पंकज खंडाईत, चंदू बावणे, जयदेव हटवार, भूषण मेश्राम, राजेश देशमुख, नितेश चांदेवार, दिलीप हटवार, पुरुषोत्तम भुसारी, ईश्वर हटवार, अशोक वैरागडे, सुखदेव बावनथडे उपस्थित होते.
कोट
निवेदनाची दखल घेऊन पाठपुरावा करण्यात येईल व लवकरात लवकर सोयीसुविधा उपलब्ध करण्यात याव्या म्हणून वरिष्ठांकडे कळवू.
डॉ. ललीत नाकाडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पालांदूर
190821\img-20210818-wa0115.jpg
photo