शिक्षक संघाचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:31 AM2021-03-22T04:31:45+5:302021-03-22T04:31:45+5:30
सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीला कार्यरत सर्व शिक्षकांच्या सेवापुस्तकात जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडून मान्यता करून घेणे. ...
सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीला कार्यरत सर्व शिक्षकांच्या सेवापुस्तकात जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडून मान्यता करून घेणे. २४ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांची निवड श्रेणी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करणे. मागणीनुसार रक्कम प्राप्त झाल्यानंतर तत्काळ शिक्षकांचे देयक अदा करण्यात यावे. शिक्षकांनी शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी निवदेन देण्यात आले. समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
शिष्टमंडळात मुलचंद वाघाये, विकास गायधने, संतोष खंडारे, विलास टिचकुले, रपेश फटे, पालांदूर, रमेश पारधीकर, धनराज ठवकर, ज्ञानेश्वर लांडगे, भारत राघोर्ते, मधुसुदन डहाके, घनश्याम मेंढे, भाविक रामटेके, केवळराम टिचकुले, हितेंद्र शेंडे व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.