व्यसनापासून दूर राहा, निरोगी आयुष्य जगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:46 PM2018-06-02T21:46:07+5:302018-06-02T21:46:07+5:30
तंबाखू सेवनाने अनेक दुर्धर आजार होतात तरी सुध्दा समाजात तंबाखू सेवनाचे प्रमाण सतत वाढत आहे. तंबाखूपासून कसे दूर राहता येईल याबाबत प्रत्येकाने जागरुक राहणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर रहा, निरोगी आयुष्य जगा, असा सल्ला मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तंबाखू सेवनाने अनेक दुर्धर आजार होतात तरी सुध्दा समाजात तंबाखू सेवनाचे प्रमाण सतत वाढत आहे. तंबाखूपासून कसे दूर राहता येईल याबाबत प्रत्येकाने जागरुक राहणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर रहा, निरोगी आयुष्य जगा, असा सल्ला मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी दिला.
जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्व आरोग्यासाठी महत्वाचे असल्यामुळे सामान्य रुग्णालय भंडारा, सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृह भंडारा येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून सिव्हिल न्यायाधीश कोठारी, तलमले, जिल्हा शल्य चिकित्सक रवीशेखर धकाते, रेड क्रॉस सोसायटीचे सल्लागार डॉ. ब्राम्हणकर, उपाध्यक्ष डॉ. गिºहेपुंजे, सचिव डॉ. गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नैतामे, डॉ. प्रशांत उईके प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. धकाते यांनी केले. त्यांनी तंबाखू माणूस खातो नंतर मात्र तंबाखू माणसाला खातो. म्हणून सर्वांनी तंबाखू सारख्या व्यसनापासून स्वत:ला दूर ठेवावे तसेच आध्यात्मिक विचारांची जोपासना करावी. अशा वाईट सवयींवर विजय मिळवावा. सर्व संस्थांनी भंडारा जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमानिमित्त जिल्हा रुगणालयात पथनाट्य सादर करण्यात आले शेवटी तंबाखू मुक्तीसाठी शपथ घेण्यात आली. जागतिक तंबाखू विरोधी दिन व सप्ताहानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहे. यात रांगोळी र्स्पर्धा, पोस्टर, रॅली, तंबाखूमुक्त जिल्हयासाठी तंबाखू विरोधी शपथ, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेत जनतेने जास्तीत जास्त संख्येने उत्सर्फूतपणे सहभागी व्हावे. तसेच मार्गदर्शन व उपचाराचा लाभ घ्यावा. ६ जून बुधवारी मौखिक व कर्करोग शिबीर दंत विभाग तसेच हृदयरोग शिबीराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ जास्तीत जास्त लोकानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते यांनी केले आहे. संचालन प्राजक्ता पेठे यांनी तर आभार डॉ. उईके यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा सल्लागार डॉ. समीम फराज, डॉ. विभ्रता लेझ, डॉ. सुधा मेश्राम, आरती येरणे, सपना ठाकरे, तृप्ती बोभाटे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.