-तरीही खर्रा ‘पन्नी’तच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:42 AM2018-06-29T00:42:28+5:302018-06-29T00:42:47+5:30

राज्य शासनाने याच आठवड्यात प्लास्टिकवर राज्यव्यापी बंदी आणली. पहिल्या दिवसापासून राज्यात नगर पालिका प्रशासनाकडून प्लास्टिक वापरणाऱ्यांविरूद्ध कारवाई करणे सुरू झाले. मात्र खर्रा शौकिनांच्या भंडारा जिल्ह्यात मात्र प्लास्टिकच्या पन्नीतच आजही खर्रा घोटणे सुरूच आहे.

Still, in the 'Pony' | -तरीही खर्रा ‘पन्नी’तच सुरू

-तरीही खर्रा ‘पन्नी’तच सुरू

Next
ठळक मुद्देप्लास्टिकबंदी कागदावर : कारवाई करणार तरी कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाने याच आठवड्यात प्लास्टिकवर राज्यव्यापी बंदी आणली. पहिल्या दिवसापासून राज्यात नगर पालिका प्रशासनाकडून प्लास्टिक वापरणाऱ्यांविरूद्ध कारवाई करणे सुरू झाले. मात्र खर्रा शौकिनांच्या भंडारा जिल्ह्यात मात्र प्लास्टिकच्या पन्नीतच आजही खर्रा घोटणे सुरूच आहे. परंतु पालिकेने एकही कारवाई केल्याची नोंद नाही. मुळात राज्यात गुटखाबंदी असताना गुटखा मिळणे आणि आता प्लास्टिक बंदी असताना खर्रा घोटणे सुरू असल्यामुळे व्यसनाधिनतेवर आळा घालणार की व्यसनाधिनता वाढवायची असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
महाराष्ट्रात कुठे नव्हे ईतका खर्रा (सुपारी, तंबाखू व चुना मिश्रण) सेवनाचे प्रमाण पूर्व विदर्भात आहे. त्यातही भंडारा जिल्ह्यात सुका व ओला खर्रा मिळतो. ओला खर्रा तर मोठ्या प्रमाणावर विकला जातो. हा खर्रा प्लॉस्टिकच्या पन्नीत घोटण्यात येतो. परंतु गत आठवड्यात प्लास्टिक पिशवी, पेपरवर बंदी घालण्यात आल्यामुळे पानठेले विक्रेते खर्रा कशात घोटत आहेत, याची पाहणी करण्यासाठी फेरफटका मारला असता सर्वत्र प्लास्टिकच्या पन्नीतच खर्रा घोटत असल्याचे दिसून आले. शहरासह ग्रामीण भागातील सर्वच पानठेल्यावर पन्नीतून खर्रा घोटून विकला जात असल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात शहरातील जवळपास १२ ते १५ पानठेल्यावर जाऊन पाहणी केली असता सर्वच ठिकाणी प्लास्टिक बंदीचा फज्जा दिसून आला. पानठेला चालकांशी चर्चा केली असता नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर त्यांनी आपआपल्या व्यथा कथन केल्या. गुटखा बंदी असो किंवा प्लास्टिक बंदीचा प्रकार आमच्या जिवावर उठणारा आहे. या व्यवसायातून हजारो कुटूबांचा उदरनिर्वाह चालतो.
शासन मोठ्या व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन सर्वसामान्याला वेठीस धरत आहे. आता बेरोजगारीची वेळ येऊन आल्याने शासनाने रोजगाराची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. शासनाने किराणा दुकानात प्लास्टिक बंदीच्या निर्णयात बदल केल्यामुळे आता त्या प्लास्टिक पिशव्यांमधून खर्रा घोटून दिला जाईल. याउपरही कारवाई केल्यास शेतकºयांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, असेही काही पानठेला चालकांनी ‘लोकमत’ चमुशी बोलताना सांगितले.
‘त्या’ मशिनचे करायचे काय ?
भंडारा जिल्ह्यात खर्रा विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे अनेक पानठेला व्यावसायिकांनी खर्रा घोटण्यासाठी चार ते पाच हजार रूपये खर्चून ईलेक्ट्रानिक मशिन विकत घेतले होते. या मशिनमध्ये जो खर्रा घोटण्यात येत होता. त्याला प्लास्टिकमध्ये गुंडाळून ते मशिनमध्ये टाकून घोटण्यात येत होते. आता प्लास्टिक बंदीमुळे या मशिनचे काय करायचे? असा प्रश्न पानठेला चालकांना पडला आहे.
गुटखा बंदी कागदावरच!
राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केल्यानंतर या मोहिमेला काहीअंशी यश मिळत असताना गुटखा बंदी मात्र फसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गावांपासून शहरापर्यंत सर्वच ठिकाणी गुटख्याची राजरोस विक्री सुरू आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून गुटखा तस्करी होत आहे. परंतु कारवाई होत नाही. आता प्लास्टिक बंदीसाठी कारवाईची मोहीम सुरू असताना गुटखा बंदीची कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या घोषणेनंतर आम्ही मोठे व्यापारी आणि जिथे प्लास्टिकचा वापर जास्त आहे, अशांवर प्रथम कारवाई करीत आहोत. आतापर्यंत २० हजार रूपयांचा दंड वसुल केला आणि ५० किलो प्लॉस्टिक पिशव्या जप्त करण्यात आले. त्यानंतर प्लास्टिक मुक्तीसाठी सर्वत्र कारवाई करू.
- ज्ञानेश्वर ढेरे,
मुख्याधिकारी, न.प. भंडारा.

Web Title: Still, in the 'Pony'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.