दगडाने ठेचून तरूणाचा खून

By Admin | Published: February 14, 2017 12:13 AM2017-02-14T00:13:46+5:302017-02-14T00:13:46+5:30

दगडाने ठेचून एका १८ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. सारंग अजय श्यामकुंवर रा. लाखनी असे मृतकाचे नाव आहे.

Stone crushed bloodstream | दगडाने ठेचून तरूणाचा खून

दगडाने ठेचून तरूणाचा खून

googlenewsNext

लाखनीतील रहिवासी : पुरकाबोडी रस्त्यावर आढळला मृतदेह
अड्याळ : दगडाने ठेचून एका १८ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. सारंग अजय श्यामकुंवर रा. लाखनी असे मृतकाचे नाव आहे. अंगावर शहारे आणणारी ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजता अड्याळ पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या पुरकाबोडी मार्गावर उघडकीला आली. विद्रृप अवस्थेत सारंगचा मृतदेह आढळला. मित्रांसोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरून सारंगची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत असे की, सारंग श्यामकुंवर व त्याचे दोन मित्र (दोन्ही रा. लाखनी) यांच्यामध्ये नेहमी पैशांची देवाणघेवाण होत असायची. याच कारणावरून काल रविवारी सायंकाळी ४ वाजतानंतर तिघेही जण घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत तिघेही घरी परतले नाही तसेच लाखनीतील एका तरूणाचा खून झाल्याची चर्चाही शहरात पसरली. यासंदर्भात चर्चा असतानाच सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सारंगचा मृतदेह पुरकाबोडी रस्त्यावर आढळला. त्याची हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला असावा, असा कयास अड्याळ पोलिसांनी व्यक्त केला. त्याच्या चेहऱ्यावर दगडाने वार करून चेहरा विद्रृप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रविवारी सायंकाळी घरून निघाल्यानंतर सारंगचा आज मृतदेहच विद्रृप स्थितीत आढळला. त्याचे दोघे मित्रही बेपत्ता असल्याने संशयाची सुई त्यांच्याकडे वळाली. सारंग हा लाखनी येथील रहिवासी असून त्याच्या मागे आई, वडिल, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे. अड्याळ पोलिसांनी दोन संशयितांविरूद्ध भादंविच्या ३०२ (३४) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक अजाबराव नेवारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (वार्ताहर)

पैशांच्या देवाण घेवाणीवरून सारंगची हत्या करण्यात आली असावी, असा कयास प्राथमिक तपासातून व्यक्त होत आहे. यासंदर्भात संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
-अजाबराव नेवारे,
पोलीस निरीक्षक अड्याळ.

Web Title: Stone crushed bloodstream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.