संच मान्यतेपर्यंत शिक्षक समायोजनांची प्रक्रिया थांबवा

By admin | Published: April 17, 2017 12:28 AM2017-04-17T00:28:22+5:302017-04-17T00:28:22+5:30

सन २०१६-१७ च्या संचमान्यतेमध्ये दुरुस्ती करुन सुधारित संच मान्यता मिळेपर्यंत शिक्षक समायोजनाची प्रकिया थांबवावी,

Stop the adjustment of teacher adjustments until the set assumes | संच मान्यतेपर्यंत शिक्षक समायोजनांची प्रक्रिया थांबवा

संच मान्यतेपर्यंत शिक्षक समायोजनांची प्रक्रिया थांबवा

Next

शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : मुख्याध्यापकसंघाची मागणी
भंडारा : सन २०१६-१७ च्या संचमान्यतेमध्ये दुरुस्ती करुन सुधारित संच मान्यता मिळेपर्यंत शिक्षक समायोजनाची प्रकिया थांबवावी, अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षण आयुक्त पुणे यांना शिक्षणाधिकारी माध्य. बी. एल. थोरात यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.
सदर संघाने दिलेल्या निवेदनात संच मान्यता सन २०१६-१७ मध्ये विविध त्रुटी दुरुस्त करुन सुधारित संच मान्यता देण्यात यावी त्यात ९ वी, १० वी, ला ३ शिक्षक पदे मजूर करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. सन २०१५-१६ च्या संच मान्यतेतील प्रस्तावित पदे मान्य पदामध्ये मंजूर करावी. अतिरिक्त ठरलेल्या मुख्यध्यापकाचे पद संच मान्यतेमध्ये दर्शविण्यात यावे. तसेच सन २०१४-१४, २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ च्या संच मान्यतेतील त्रुटयांची दुरुस्ती केलेली नाही ती करावी. वर्गवार पट संख्या व शिक्षक संख्या चुकीची पट असल्या एक शिक्षक मंजूर करावे.
या बाबत शाळेचे वेतन रोखण्यात येवू नये व मुख्याध्यापकावर अनुचित कार्यवाही करण्यात येवू नये. सदर मागण्याच्या संदर्भात शिक्षण विभागाने संच मान्यतेमध्ये सुधारणा करुन सुधारित संच मान्य मिळेपर्यंत शिक्षक समायोजनाची प्रक्रिया थांबवावी अन्यथा जिल्हा मुख्याध्यापक संघ समायोजनावर बहिष्कार आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष मनोहर मेश्राम, सचिव जी.एन. टिचकुले, सहसचिव अनमोल देशपांडे, प्रदीप गेडाम, कुंदा गोडबोले, आनंद भोवते आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Stop the adjustment of teacher adjustments until the set assumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.