शेतकऱ्यांचे पुन्हा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:00 AM2020-10-29T05:00:00+5:302020-10-29T05:00:20+5:30
सालई खुर्द येथे महामार्गावर बुधवारी सकाळी १० वाजता उसर्रा, सालई खुर्द, टांगा, पालडाेंगरी, सिहरी, बपेरा, नेरला, रामपूर गावातील शेतकरी एकत्र आले. आणि त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे गत आठवड्यात बावनथडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले तेव्हा लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने शेतकरी पुन्हा बुधवारी रस्त्यावर उतरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : बावनथडी प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडण्याच्या मागणीसाठी पुन्हा शेतकरी रस्त्यावर उतरले असून बुधवारी मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे तुमसर-रामटेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
सालई खुर्द येथे महामार्गावर बुधवारी सकाळी १० वाजता उसर्रा, सालई खुर्द, टांगा, पालडाेंगरी, सिहरी, बपेरा, नेरला, रामपूर गावातील शेतकरी एकत्र आले. आणि त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे गत आठवड्यात बावनथडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले तेव्हा लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने शेतकरी पुन्हा बुधवारी रस्त्यावर उतरले. आंदोलनस्थळी आंधळगावचे ठाणेदार दीपक वानखेडे, तुमसरचे ठाणेदार रामेश्वर पिपरेवार यांनी चोख बंदोबस्त लावला होता.
दरम्यान आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार अनिल बावनकर यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली. मद्यस्थी करीत मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यावेळी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत दोन दिवसात बैठक करून तोडगा काढू, असे आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्यात आला. या आंदोलनात अशोक पटले, नितीन लिल्हारे, प्यारेलाल दमाहे, डॉ. सुनील चवळे, सुभाष गायधने, अशोक शरणागत, मुलचंद पटले, भोलाराम पारधी, प्रकाश खराबे, रामू बघेले, नंदलाल लिल्हारे, ईश्वरदयाल गिर्हेपुंजे, श्रीकांत बन्सोड, शैलेश लिल्हारे, झनकलाल दमाहे, तुळशी मोहतुरे, दुर्गाप्रसाद बघेले, भूषण ठाकरे, चंदन लिल्हारे, शिवदास दमाहे, प्रदीप बंधाटे, गणेश दमाहे, शिवदास लिल्हारे, ईश्वर बाेंदरे आदी शेतकरी उपस्थित होते.
निसर्गामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशा स्थितीत आपण शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाहीत. बावनथडीचे पाणी योग्य निर्णय घेवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
-राजू कारेमाेरे, आमदार.