मालमत्ताधारकांनाकडून सक्तीची वसुली थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:51+5:302021-09-25T04:38:51+5:30

तुमसर : कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेसह, शेतकरी, नौकरवर्ग, व्यापारी आदी सर्वच प्रभावित झाले परिणामी राज्य सरकारने कुणाकडूनही ...

Stop forcible recovery from property owners | मालमत्ताधारकांनाकडून सक्तीची वसुली थांबवा

मालमत्ताधारकांनाकडून सक्तीची वसुली थांबवा

Next

तुमसर : कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेसह, शेतकरी, नौकरवर्ग, व्यापारी आदी सर्वच प्रभावित झाले परिणामी राज्य सरकारने कुणाकडूनही व कोणतीही करवसुली सक्तीची करू नये असे निर्णय घेतले असताना त्या निर्णयाला बगल देत तुमसर नगर परिषदेने मालमत्ताधारकावर अतिरिक्त व्याज आकारणी करून कोर्टाची नोटीस बजावण्याचा अफलातून प्रकार उघडकीला आला आहे. सदर प्रकार हा अन्यायकारक असून, नगर परिषदेने तत्काळ ही सक्तीची करवसुली थांबवावी अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

कोरोनाकाळात अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू ओढवल्याने आम जनतेच्या कुटुंबीयांवर दुःखाचे सावट उभे असल्याने गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणतेही कर जबरदस्ती वसूल करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश दिले आहे.

मात्र असे असतानादेखील त्या आदेशाची अवहेलना करीत तुमसरनगर परिषदेने गतवर्षी थकीत झालेल्या मालमत्ताधारकांना कोर्टातून नोटीस बजावून तत्काळ पैसे भरण्यास सांगितले आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याने मालमत्ताधारक खूप घाबरलेले असून, मानसिक तणावात जीवन जगत आहेत. भविष्यात त्यांच्या जीवितास ही धोका निर्माण झाला असल्याने पुढे होणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकाराला टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तत्काळ सक्ती करवसुली थांबवावी अन्यथा तुमसर तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे मोठे जनआंदोलन करण्यात येईल, अशा इशारा प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रमोद तितिरमारे यांनी दिला आहे.

Web Title: Stop forcible recovery from property owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.