रेतीचे अवैध उत्खनन, दारुचा व्यापार बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:39 AM2017-10-22T00:39:46+5:302017-10-22T00:39:56+5:30

कान्हळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात करडीचे ठाणेदार तुकाराम कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन केले होते.

Stop the illegal excavation of the sand, liquor trade | रेतीचे अवैध उत्खनन, दारुचा व्यापार बंद करा

रेतीचे अवैध उत्खनन, दारुचा व्यापार बंद करा

Next
ठळक मुद्देकान्हळगाव येथे मोबाईल पोलीस स्टेशन : समस्य सोडविण्याचे ठाणेदारांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कान्हळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात करडीचे ठाणेदार तुकाराम कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन केले होते. यात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक तसेच दारुचा चोरटा व्यापार बंद करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर ठाणेदारांनी त्वरीत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच गीता रोडके, नवनिर्वाचित सरपंच दिगांबर कुकडे, भूपेश ईश्वरकर, बलवान चवळे, तुषार सोनारे, लक्ष्मण रोडके, जयदेव कुकडे, राजेश रोडके, मोहपत मंडये, ज्ञानदेव कुकडे, कवळू पंचबुद्धे, व्यंकट हिंगे, सतीश रोडके, मनोहर भोयर, सुनिल हिंगे, विलास सेलोकर, देवाजी रोडके, आनंद भोयर, चेतन मंडपे व ग्रामस्थ उपस्थित होते.
मोबाईल पोलीस ठाणे कार्यक्रमात विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश रोडके यांनी संपूर्ण गावातील दारुबंदी झाली पाहिजे तसेच परिसरातून गावात येणाºया दारुवर पायबंद लागला पाहिजे, अशी मागणी केली. दारुमुळे अनेक कुटुंबांचा संसार उध्वस्त झाल्याचे ठाणेदार कोयंडे यांच्या लक्षात आणून दिले.
गावातील नागरिक रस्त्यांवर बांधीत असलेल्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अनेकांना त्रास होत आहे. त्यावर आवर घालण्यासाठी पोलिसांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. कान्हळगाव येथून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. तसेच मुंढरी व अन्य घाटांवरून होणाºया अवैध रेती चोरीमुळे करडी ते खडकी मुख्य रस्त्यांचे बेहाल झाले आहेत. त्यावर वेळीच आळा घालण्याची मागणी राजेश रोडके यांनी यावेळी व्यक्त केले. उपस्थित सर्वांनी त्यांच्या मुद्यांचे समर्थन करीत पोलीस विभागाने याकडे लक्ष घालण्याची मागणी केली.
पोलीस विभागाच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मागण्यांवर तात्काळ लक्ष घातले जाईल. तसेच गावातील रस्त्यांवर जनावरे बांधण्याचे प्रकरणी कान्हळगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन तसे पोलिसांना सहकार्य मागावे, असे आश्वासन ठाणेदार तुकाराम कोयंडे यांच्यावतीने देण्यात आले.

Web Title: Stop the illegal excavation of the sand, liquor trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.