नदी घाटातून रेतीचा अवैध उपसा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:56+5:302021-04-10T04:34:56+5:30

गत काही दिवसांपासून शासन- प्रशासनाच्या दुर्लक्षाने तालुक्यातील तावशी नदीघाटातून नियमित रेतीचा अवैधा उपसा करुन ट्रक्टरने वाहतूक केली जात आहे. ...

Stop illegal extraction of sand from river ghats | नदी घाटातून रेतीचा अवैध उपसा थांबवा

नदी घाटातून रेतीचा अवैध उपसा थांबवा

Next

गत काही दिवसांपासून शासन- प्रशासनाच्या दुर्लक्षाने तालुक्यातील तावशी नदीघाटातून नियमित रेतीचा अवैधा उपसा करुन ट्रक्टरने वाहतूक केली जात आहे. सदर वाहतूक ट्रॅक्टरने सुसाट वेगाने केली जात आहे. वाहतूक अडविताना अपघात होवून जीवित हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नियमित अवैधरित्या रेतीचा उपसा होत असल्याने या नदी पात्रातील रेती पूर्णत: संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. तथापि, नदीतील रेतीसाठा कमी होवून परिसरातील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

या सबंध परिस्थितीची दखल घेत तालुका प्रशासनाने तावशी नदीघाटात रेतीचा अवैध उपसा व वाहतूक थांबविण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

लाखांदूरचे नायब तहसीलदार देवीदास पाथोडे यांना निवेदन देतांना गाडगेबाबा वाचनालय समितीचे भगवान शिवणकर, नाना फुंडे, आदेश शेंडे, प्रशिक सोनवाने, मोहित पाथोडे, निखिल शेंडे, पीयूष बडोले, रमेश फुंडे यासह अन्य पदाधिकारी व गावकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Stop illegal extraction of sand from river ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.