धान खरेदी केंद्रांवरील गैरप्रकार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:35 AM2021-01-03T04:35:10+5:302021-01-03T04:35:10+5:30
जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या संदर्भात खासदार सुनील मेंढे यांनी आढावा घेतला. त्यावेळी केंद्रांवरील भोंगळ कारभार पुढे आला. साकोली ...
जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या संदर्भात खासदार सुनील मेंढे यांनी आढावा घेतला. त्यावेळी केंद्रांवरील भोंगळ कारभार पुढे आला.
साकोली तालुक्यातील निलज येथे असलेल्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर मागच्या खरेदी हंगामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले होते. केंद्रावरील ग्रेडर आणि संस्थेचे अध्यक्ष या दोघांनी गैरप्रकार केला होता. यावरून या केंद्राची मान्यता रद्दही करण्यात आली होती. परंतु पुन्हा मान्यता देण्यात आली. येथे आता शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. या केंद्रासह जिल्ह्यातील अन्य केंद्रांवरही अशीच परिस्थिती आहे. अशा केंद्रांवरील गैरव्यवहार थांबविण्याच्या दृष्टीने चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास कारवाई केली जावी, अशी सूचना खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्याला केली आहे.