दलित वस्ती सुधार योजना निधीचा गैरवापर बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:38 AM2021-08-22T04:38:20+5:302021-08-22T04:38:20+5:30
नगरातील हनुमान मंदिर ते फिल्टर प्लांटच्या टाकीपर्यंत पेवर ब्लॉक लावण्याचे काम मंजूर असून ते काम सुरू आहे. वास्तविक पाहता ...
नगरातील हनुमान मंदिर ते फिल्टर प्लांटच्या टाकीपर्यंत पेवर ब्लॉक लावण्याचे काम मंजूर असून ते काम सुरू आहे. वास्तविक पाहता कामाच्या परिसरात व सभोवताली कुठेही दलितांचे घर नाहीत. तसेच त्या पेवर ब्लॉकच्या सुभोभित करण्याने कोणतेही दलित वस्ती सुभोभित होत नाही. केवळ निधी खर्च करून कमिशन लाटण्याचा हा प्रकार आहे. या कामात नगररचनाकार कार्यालय भंडारा व नगरपरिषद बांधकाम विभाग लिप्त आहे. यामुळे दलित वस्ती सुधार सुधार निधीचा दूर उपयोग होत आहे, असा आरोप तुमसर राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शहरातील बांधकाम तत्काळ बंद करून दलित वस्ती सुधार निधीचे रक्षण करण्यात यावे, उर्वरित निधीतून वास्तविक दलित वर्ग जिथे राहते त्या भागाचा विकास करण्यात यावे जेणे करून दलित समाजावर अन्याय होणार नाही, ज्यांचा निधी त्यांच्याच विकास कामांना येईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी केली. १५ दिवसांत कोणतीही कारवाई न झाल्यास नगरपरिषद कार्यालय तुमसरच्या मुख्यद्वाराजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे घंटानाद व जन-जागरण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.