आता तरी थांबवा ‘अ‍ॅट्रासिटी’ कायद्याचा दुरुपयोग

By admin | Published: September 8, 2015 12:37 AM2015-09-08T00:37:06+5:302015-09-08T00:37:06+5:30

जातीय भेदभावाचा सामना करणाऱ्या तसेच अत्याचार सोसणाऱ्या दलीत समाजाला संरक्षण देण्यासाठी अ‍ॅट्रासिटी ..

Stop Now 'Abuse of Abuse Act' | आता तरी थांबवा ‘अ‍ॅट्रासिटी’ कायद्याचा दुरुपयोग

आता तरी थांबवा ‘अ‍ॅट्रासिटी’ कायद्याचा दुरुपयोग

Next

परमानंद मेश्राम यांचे आवाहन : एकोपा कायम ठेवण्याची गरज
भंडारा : जातीय भेदभावाचा सामना करणाऱ्या तसेच अत्याचार सोसणाऱ्या दलीत समाजाला संरक्षण देण्यासाठी अ‍ॅट्रासिटी कायदा बनविण्यात आला होता. या कायद्यामुळे जातीच्या आधारावर अत्याचार कमी झाले. परंतु काही लोकांकडून आपल्या गोरखधंद्यावर पडदा घालण्यासाठी ‘अ‍ॅट्रासिटी’ कायद्याचा दुरुपयोग होत आहे. दुरुपयोग करणाऱ्या लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांचा उद्देश तपासून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी केली आहे.
भंडारा जिल्ह्यात झालेल्या एकामागून एक अशा तीन घटना घडल्यानंतर अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत होणाऱ्यात तक्रारीसंदर्भात ते म्हणाले, भंडारा शहरात गांजा व्यवसायिकांविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर टाकळी येथील नागरिकांनी एका गांजा व्यावसायिकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर या व्यावसायिकांनी अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत टाकळी वासीयांच्या विरोधात तक्रार दिली.
भंडारा येथील सहकारनगर येथे अतिक्रमण कारवाईदरम्यान नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका राजकीय पदाधिकाऱ्याने नगर पालिकेच्या कर्मचाऱ्याच्या थोबाडीत हाणली. त्यांच्या अटकेच्या मागणीमुळे पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. मारहाणीच्या दोन दिवसानंतर पालिका कर्मचाऱ्याच्या विरुद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत तक्रार देण्यात आली.
पवनी येथील तहसील कार्यालयात झालेल्या वादानंतर तहसीलदार आणि पुरवठा निरिक्षक यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत तक्रार देण्यात आली. त्यानंतर महसुल कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले. हे आंदोलन भंडाऱ्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे नेण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे घेऊन गेले. तिथे अधिकारावरुन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यातच खडाजंगी झाली. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना अटक केली. अटकेतील लोक जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन आता पवनीचे तहसीलदार व पुरवठा निरीक्षक यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
त्यामुळे पूर्वीच्या तक्रारीत जातिवाचक शिवीगाळ नसताना अटक केल्यानंतरच्या तक्रारीत जातिवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा कायद्याचा दुरुपयोग नाही कां? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करताना पोलीस प्रशासनाने दुरुपयोग करणाऱ्या लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांचा उद्देश तपासून कारवाई करण्याची गरज आहे. जेणेकरुन दोन समाजातील एकोपा कायम ठेवता येऊ शकतो, कायद्याचा दुरुपयोग करण्याच्या प्रकारामुळे दोन समाजातील कटूता वाढत आहे, त्यामुळे यावर आळा घालण्याची मागणीही परमानंद मेश्राम यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Stop Now 'Abuse of Abuse Act'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.