जिभेचे लाड थांबवा; तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:50+5:302021-09-05T04:39:50+5:30
काय काळजी घेणार तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळा, डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा, अल्सरवर उपचार सुरू असताना रुग्णाने योग्य आहार ...
काय काळजी घेणार
तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळा, डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा, अल्सरवर उपचार सुरू असताना रुग्णाने योग्य आहार पथ्य सांभाळणेही गरजेचे असते. तसेच डाॅक्टरांनी दिलेल्या औषधी वेळेवर पूर्णच घ्याव्या. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. घरीच शिजलेले अन्न खावे.
पौष्टिक आहार महत्त्वाचा
अल्सर असलेल्या रुग्णांनी तिखट, मसालेदार, खारट पदार्थ खाणे टाळावे. तसेच बेसनाचे पदार्थ, बटाटे खाणे टाळावे. यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. यासाठी हलका आहार घ्यावा तसेच वरण, भात, पोळी, जेवणात तुपाचा वापर करावा. योग्य औषधोपचारासोबत केळी, डाळिंब, सफरचंद अशी फळे खावीत.
- डाॅ. मधुकर रंगारी
अल्सर असल्यास ग्लासभर दूध आहारात असावे. तूप घालून वरणभात खावा. तूप हे उत्तम, पित्तनाशक असल्याने याने ॲसिडिटी कमी होऊन अल्सरवर खूप चांगला उपयोग होतो. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स घटक असल्याने दह्याचा आहारात समावेश करावा. दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. आहारात हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
-डाॅ. प्रफुल नंदेश्वर