रेतीघाट विरोधात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 10:59 PM2017-09-05T22:59:18+5:302017-09-05T22:59:37+5:30
मांडवी येथील रेती घाटातील रेती वाहून नेणाºया जड वाहतुकीमुळे मांडवी परसवाडा दरम्यान तीन कि.मी. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मांडवी येथील रेती घाटातील रेती वाहून नेणाºया जड वाहतुकीमुळे मांडवी परसवाडा दरम्यान तीन कि.मी. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांच्या नेतृत्वात परसवाडा (सि) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
मांडवी -परसवाडा रस्ता वर्दळीचा असून मांडवी येथे वैनगंगा नदी पात्र आहे. नदीघाटाचा लिलाव शासनाने केला आहे. ट्रकच्या जड वाहतुकीमुळे तीन कि.मी. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून अपघाताला आमंत्रण रस्ता म्हणून त्याची सध्या ओळख बनली आहे. रविवारी दुपारी तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांच्या नेतृत्वात परसवाडा येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित कंत्राटदाराने खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. रस्ता रोको आंदोलनात गटनेते हिरालाल नागपुरे, पिंटू हुड, मिलींद हिवरकर, बंडू राऊत, युवराज हुड, अर्जुन शेंडे, यशवंत येडे, सुरेश बोरले, बंडू कावळे, चुन्नीलाल गौपाले, मुरलीधर गोतमारे, दामोधर हुडसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.