जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:34 AM2021-03-19T04:34:50+5:302021-03-19T04:34:50+5:30
पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाववाढ कमी करा, जीवनावश्यक वस्तूची भाववाढ थांबवा, भाजपा सरकारच्या अन्यायकारक धोरणामुळे शेतकरी, कामगार, बेरोजगार हलाखीचे ...
पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाववाढ कमी करा, जीवनावश्यक वस्तूची भाववाढ थांबवा, भाजपा सरकारच्या अन्यायकारक धोरणामुळे शेतकरी, कामगार, बेरोजगार हलाखीचे जीवन जगत आहेत. बेरोजगारांना रोजगार नाही. बेरोजगारांना रोजगार देण्यात यावे, लोहा, सिमेंट, रेती भाववाढ कमी करा, खाद्यतेलाचे भाव कमी करा, अशा विविध मागण्यांचे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी मोहाडीकडून तहसीलदार मोहाडी बोंबार्डे यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांच्या नेतृत्वात मोहाडी राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी प्रमुख पदाधिकारी खुशाल कोसरे, विजय पारधी, रिता हलमारे, तारा हेडाऊ, किरण अतकारी, प्रतिमा राखडे, आनंद मलेवार, रफिक सय्यद, पुरुषोत्तम पात्रे, श्याम कांबळे, विजय बारई, मुरलीधर गायधने, महादेव फुसे, दिलीप गजभिये, एकनाथ फेंडर, चेतन ठाकूर, नरेश इश्वरकर, गौरीशंकर पालांदूरकर, किशोर सेलोकर, उरकुडा राखडे, नरेश कुथे, दुर्योधन बोरकर, मिनाज शेख, मदन गडरिये, सुशांत बाळू लिल्हारे, नरेंद्र आग्रे महादेव बुरडे, यांची उपस्थिती होती. निवेदन देऊन विविध विषयांवर तहसीलदार यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. त्यात ग्रामीण भागात घरकुल रक्कम वाढ करण्यात यावी, शहरी भागातसुद्धा घरकुल निधीत वाढ करून, घरकुलाचे हप्ते वेळेवर लाभार्थी यांना देण्यात यावे, अशी मागणीसुद्धा करण्यात आली. केंद्र शासनाच्या काळात अराजकता माजली असून देश देशोधडीला लागला आहे. मोदी यांच्या विविध धोरणाचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी मोहाडीकडून निषेध नोंदविण्यात आला.