गोबरवाही येथे रस्ता रोको
By admin | Published: February 5, 2015 11:03 PM2015-02-05T23:03:39+5:302015-02-05T23:03:39+5:30
ऐरवी शासकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले तर स्थगिती करीता कुणी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत नाही. पोलीस विभागातील असेल तर नाहीच नाही.
स्थानांतरण रद्द करा : आदिवासी संघटनेचा एल्गार
तुमसर : ऐरवी शासकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले तर स्थगिती करीता कुणी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत नाही. पोलीस विभागातील असेल तर नाहीच नाही. परंतु गोबरवाहीचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण भंडारा येथे झाले. ते स्थानांतरण रद्द करण्याकरिता आदिवासी संघटनांनी एल्गार पुकारला आहे.
उद्या शुक्रवारी याकरिता गोबरवाही येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी राज्याचे आदिवासी राज्यमंत्री तथा उर्जामंत्री तुमसर तालुक्यात आहेत हे विशेष.
गोबरवाही येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे २० नोव्हेंबर २०१३ ला रूजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात कोणतीच तक्रार नसून अवैध धंद्यांना आळा बसला होता. वाढीवे यांचे स्थानांतरण हेतूपुरस्सर करण्यात आले असा आरोप आॅल इंडिया आदिवासी पिपल्स फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन शिष्टमंडळाने दिला.
गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, खा.नाना पटोले व आमदार चरण वाघमारे यांच्यासह राज्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस महासंचालकांना निवेदन दिले.
शुक्रवारी गोबरवाही पोलीस स्टेशनसमोर तुमसर कटंगी मार्गावर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात जि.प. सदस्य अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, पं.स. सदस्या प्रभा पेंदाम यांच्यासह ३२ पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)