बेटाळा रेतीघाटातील रेतीची चोरी थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 12:32 AM2017-05-28T00:32:32+5:302017-05-28T00:32:32+5:30
मोहाडी तालुका अंतर्गत असलेल्या बेटाळा रेतीघाटातील रेतीची चोरी थांबविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोहाडी तालुका अंतर्गत असलेल्या बेटाळा रेतीघाटातील रेतीची चोरी थांबविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बेटाळा येथील रेतीघाटाचा लिलाव सन २०१६-१७ मध्ये करण्यात आला. त्यात अ रेतीघाटाचा लिलाव झाला असून ब रेतीघाट लिलाव झालेला नाही. मात्र अधिकाऱ्यांच्या आर्शिवादाने ब रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात कधी दिवसरात्र दररोज २५ ते ३० ट्रॅक्टर रेती चोरी होत आहे. घाटातून काढलेली चोरीची रेती अनेक ठिकाणी जमा करुन ठेवलेली आहे. अपरात्री ट्रक चालत असल्यामुळे रस्ता उखडला आहे. शेतातील पिकावर धूळ बसल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्हा अधिक्षक वरुण शहारे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. शिष्टमंडळात विष्णूदास लोणारे, कन्हैया नागपुरे, विष्णु समरीत, गंगाधर नेरकर, जयराम सेलोकर, ज्ञानेश्वर जिभकाटे, अमोल लिल्हारे, कैलास समरीत, पुरुषोत्तम कांबळे यांचा समावेश होता.