गोडाऊन फुल्ल झाल्याने धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:19+5:302020-12-25T04:28:19+5:30

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यात काही ठिकाणी विलंबाने धान खरेदी सुरू करण्यात ...

Stopped buying paddy due to fullness of godown | गोडाऊन फुल्ल झाल्याने धान खरेदी बंद

गोडाऊन फुल्ल झाल्याने धान खरेदी बंद

Next

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यात काही ठिकाणी विलंबाने धान खरेदी सुरू करण्यात आली. विलंबाने सुरू झाल्यामुळे शेतकऱ्याला धान विकायला विलंब झालेला आहे. या विलंबामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी धान खरेदी सुरू करण्यापूर्वी नियोजनात कमी पडत असल्याने शेतकऱ्यांची धान मोजण्याकरिता तारांबळ उडालेली आहे. धान उत्पादनाकरिता शेतकऱ्यांना असह्य त्रास सहन करीत शेती करावी लागत आहे. पूर समस्या, तुडतुडा, व आता मोजणी करिता त्रास होत आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी बारदाना अभावी धान खरेदी बंद आहे. तर गोदाम अभावाने बऱ्याच ठिकाणी धान खरेदी प्रभावित आहे. अशा कठीण प्रसंगात जिल्हा प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याप्रति सहानुभूती बाळगत तत्काळ धान खरेदी सुरू करावी. जेणेकरून शेतकरी वर्गाला धान विकायला सुलभता मिळेल.

धान कापणी बांधणी मळणी चे सगळे व्यवहार उधारीवर असल्याने शेतकरी धानाच्या कार्यासाठी आतुरलेला आहे. परंतु धानच मोजून झाले नसल्याने पैसे मागावे कुणाला हा यक्षप्रश्न पुढे आलेला आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा कर्तव्यात कसूर करीत असल्याने शेतकरी राजा केवळ नावाचाच राजा ठरलेला आहे. धान पिकवितना सुद्धा सुमार समस्या व पिक विकण्याला सुद्धा समस्याच समस्या उभ्या आहेत. जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने शेतकऱ्यांच्या समस्यांची आपुलकीने दखल घेत तत्काळ बंद असलेले धान खरेदी सुरू करावे असे शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

कोट

गोडाऊन अभावाने मागील आठ दिवसापासून धान खरेदी बंद आहे. सुमारे ३३५ शेतकऱ्यांची नऊ हजार ९९४५.८० क्विंटल धानाची खरेदी आटोपली आहे.

संजय देशमुख, ग्रेडर धान खरेदी केंद्र हरदोली.

कोट

धान मोजणी करिता शेतकरी तळमळ करीत आहेत. गोदाम अभावाने खरेदी बंद आहे. गोदाम फुल्ल झाल्याने मोजणी प्रभावित आहे. अशा कठीण प्रसंगात जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने पुढाकार घेत पर्यायी व्यवस्था करावी.

गोपीचंद भंडारकर, माजी जि.प. सदस्य तई/बु. २४ लोक ०४ के

Web Title: Stopped buying paddy due to fullness of godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.