वादळी पावसाने धानपिकाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 09:25 PM2017-10-08T21:25:59+5:302017-10-08T21:26:09+5:30
दोन दिवसांपासून जिल्ह्यातील मोहाडी तालुका वगळता परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. यात धानपिकाची नासाडी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दोन दिवसांपासून जिल्ह्यातील मोहाडी तालुका वगळता परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. यात धानपिकाची नासाडी झाली आहे. धान गर्भार अवस्थेत असल्याने पाण्याची गरज होती, हे सत्य असले तरी तरी वादळी वारा व पावसाच्या तडाख्याने काही ठकाणी धानपिक जमीनदोस्त झाल्याने पुन्हा बळीराजाची चिंता वाढली आहे.
भंडारा शहरातही दुपारच्या सुमारास हजेरी लावली. ऊन व सावलीच्या खेळात मात्र आजारालाही खत मिळत आहे. तालुक्यात १४.८ मि.मी पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली.
लाखनी/पालांदूर : तालुक्यातील पालांदूर परीसरात विजांच्या कडकडाटांसह पावसाने दमदार हजेरी लावल्याने धानपिकाचे नुकसान झाले. धान भुईसपाट झाले. यात शेतकºयाचे सुमार नुकसान झाले. पावसापासून पीक वाचविण्याकरिता शेतकºयांचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला आहे. धानपीक मातीमोल होत असल्याचे पाहून बळीराजाचा जीव कासावीस झाला आहे. अनेक अडचणींचा सामना करीत ९८ टक्के रोवणी कशीबशी पार पाडीत गणेशचतुर्थीचा मुहूर्त लागला. धान फुटण्यावर येत नाही तर पुन्हा पावसाने दीेर्घ विश्रांती घेतली. याच काळात खोडकिडी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. खर्च वाढतच आहे. नदीनाल्या काठावरील पिके अधिकच प्रभावीत झाली आहे. नरादा, मºहेगाव, पाथरी, वाकल आदी गावातील धान कापणी योग्य झाली असून काही ठिकाणी कडपा ओल्या आहेत.
साकोली : तालुक्यात काही ठिकाणी पासवाने हजेरी लावली. पहाटेच्या सुमारास पाऊस बरसला. मात्र त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे अशा वातावरणामुळे धानावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
मोहाडी : तालुक्यातील शेतकºयांना सिंचनासाठी पाण्ळाची गरज असताना परतीच्या पावसाने काी प्रमाणात हुलकावणी दिली आहे. धान गर्भार अवस्थेत असल्याने एका पाण्याची गरज आहे. ढग जमले पण बसरले नाही, अशी स्थिती पाहायला मिळाली
तुमसर : शहरात परतीच्या पावसाने हजेरी लावली मात्र तालुक्यात सर्वदूर पाऊस बरसला नाही. मागील २४ तासात १.२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.
पवनी : तालुक्यातील चौरास भागात पावसाने वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावल्याने धानपिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली त्यानंतर सायंकाळपर्यत पाऊस बरसला नाही. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे.
आसगाव चौ. : वादळी पावसाने बहुतांशी धान पिक भुईसपाट झाल्याने पिक मातीमोल होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच नेहमीप्रमाणे यंदाही असमतोल वातावरणामुळे धानावर किड तुडतुड्याने आक्रमण केल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. धान पिक जमीनीवर लोटल्याने उत्पादनावर ५० टक्के नुकसान होणार असल्याचे शेतकºयांचे मत आहे. असाच वातावरण जर आठवड्याभर राहिल्यास व त्यातच आणखी पावसाने हजेरी लावल्यास अपेक्षेपेक्षा जास्तच उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.