भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात वादळी अवकाळीचा तडाखा
By युवराज गोमास | Published: May 18, 2023 05:38 PM2023-05-18T17:38:48+5:302023-05-18T17:39:19+5:30
Bhandara News जिल्ह्यात बुधवारला दुपारच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा तडाखा बसला. वादळात कौलारू घरांचे अतोनात नुकसान झाले.
युवराज गोमासे
भंडारा : जिल्ह्यात बुधवारला दुपारच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा तडाखा बसला. वादळात कौलारू घरांचे अतोनात नुकसान झाले. टिनाचे शेड उडाले. वादळाने लोंबीवरील धान पीक जमिनीवर लोळल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. हवा्मान खात्याने मोहाडी व भंडारा तालुक्यात काही वीज कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच वादळात चार शेळ्या मृत्यूूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.
तुमसर तालुक्यात जोरदार पावसाने दस्तक दिल्याने दुपारच्या सुमारास अचानक तापमानात घट जाणवली. वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बसरला. माेहाडी तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मोरगाव येथे गुरांचा गोठा तर कुशारी येथे घरांवर मांडलेले टिनाचे शेड उडाले. तसेच वादळात चार शेळ्या मृत्यूूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.