खडकी व जांभोरा येथे सरळ लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:27+5:302020-12-30T04:44:27+5:30

युवराज गोमासे करडी(पालोरा):- गट ग्रामपंचायत खडकी व जांभोरा निवडणुकांची रंगत वाढली आहे. उमेदवारी फार्म भरण्याचा कालावधी ३० डिसेंबर आहे. ...

Straight fight at Khadki and Jambhora | खडकी व जांभोरा येथे सरळ लढत

खडकी व जांभोरा येथे सरळ लढत

Next

युवराज गोमासे

करडी(पालोरा):- गट ग्रामपंचायत खडकी व जांभोरा निवडणुकांची रंगत वाढली आहे. उमेदवारी फार्म भरण्याचा कालावधी ३० डिसेंबर आहे. राष्ट्रवादी व भाजपाने आपले

उमेदवार जाहिर करून सरळ लढतीचे संकेत दिले आहेत. तर काही वार्डात अपक्षांनी उमेदवार उभे करून निवडाणुकीला त्रिकोणी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावेळी प्रथमच सरपंचाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहिर होणार असल्याने सरपंचाचे उमेदवार कोण, राहणार हा प्रश्न सध्या तरी गौण ठरला आहे. मात्र, सरपंच होण्याची ईच्छा असलेल्या उमेदवारांन हळूहळू आपले पत्ते उघड करण्यास प्रारंभ केला आहे.

एकूण चार वाॅर्ड व ११ सदस्य संख्या असलेल्या जांभोरा गट ग्रामपंचायतीत जांभोरा, किसनपूर व लेंडेझरी गावे सामील आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजपात आमनेसामनेची लढाई होणार आहे. माजी सरपंचासोबत सलोखा असलेल्या विकास फाऊंडेशनच्या नेत्याने ऐनवेळी तलवार मान्य करून भाजपाला पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याने आता भाजपाच्या नावावर सर्व उमेदवार निवडाणुकीला समोरे जाणार आहेत. वाॅर्ड क्रमांक १ मध्ये पक्षांनी तिकिट न दिल्याने अपक्ष उमेदवार राहणार आहेत. उर्वरीत सर्व वार्डात सरळ लढती होणार आहे. यावेळची निवडणुक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची तर भाजपासाठी आत्मसन्मानाची आहे. मागील वेळी सत्तास्थापनेपासून दूर राहीलेली भाजपा यावेळी पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहे.

राष्ट्रवादीने सुद्धा स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना समोर करून आपली बाजू भक्कम करण्याचा करण्याचा प्रयत्न चालविला आहे.यावेळी प्रथमच राष्ट्रवादीला गांधी वार्डात तगडया संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.

गट ग्रामपंचायत खडकी येथे ९ सदस्य संख्या असून तीन वाॅर्ड आहेत. परंतू मुख्य लढत हनुमान मंदिर असलेल्या वार्डात पहावयास मिळणार आहे. निवडणुक काटयाची होणार असल्याने रंगत वाढली आहे. उर्वरीत दोन वॉर्डातील निवडणुकाही रोमहर्षक होणार आहेत. बोंडे व डोगरदेव गावामिळून एक वाॅर्ड असून या वाॅर्डात अपक्ष उमेदवार मैदानात असल्याने त्रिकोणी सामना होण्याची शक्यता आहे. परंतू उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरच जांभोरा व खडकी येथील निवडणुकीचे खरे चित्रे दिसणार आहेत

Web Title: Straight fight at Khadki and Jambhora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.