भटक्या श्वानाचे जनावरांसह मानवावर हल्ले, जिल्ह्यात १० हजारहून अधिक श्वान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 08:54 PM2023-09-23T20:54:25+5:302023-09-23T20:55:49+5:30
तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात ह्या लस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
देवानंद नंदेश्वर, भंडारा : भटक्या श्वानाची संख्या वाढत आहे. यातच श्वानाचे जनावरांसह मानवावर जीवघेणे हल्ले होत आहेत. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले, तर अनेकांनी जीव गमावला आहे. जिल्ह्यात १० हजारहून अधिक श्वानाची संख्या आहे. या श्वाणांना अँटी रेबीज लस देणे बंधनकारक करण्याची गरज आहे. असे असले तरी तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात ह्या लस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यात पशु संवर्धन विभागाने २०१८ वर्षात जनावरांची गणना केली होती. या गणनेत श्वानाची गणना करण्यात आली आहे. यात सर्वाधिक श्वान भंडारा तालुक्यात २३२८ श्वान आढळून आले आहेत. सर्वात कमी लाखांदूर तालुक्यात ९७३ श्वानाची नोंद करण्यात आली आहे. भटक्या श्वाणांना अँटी रेबीज लसीकरण करण्यासाठी पशु वैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध करण्यात आली आहे. आता पर्यंत २३०० श्वानांवर लसीकरण झाले आहे. श्वानाचे संख्यानुसार हा आकडा अल्प आहे. दरम्यान श्वानाची गणनेला अनेक वर्षे लोटली असल्याने पुन्हा श्वानाचे संख्येत वाढ झाले असल्याचे कुणी नाकारू शकत नाही. ग्रामीण भागात श्वानाची वाढती संख्या चिंतेचा विषय होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील भटक्या श्वानाची कधी नसबंदी करण्यात येत नाही. याशिवाय अँटी रेबीज लस देण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेत नाही. श्वानाची नोंद व आकडेवारी असली तरी जीवघेणे हल्ले होत असताना ग्रामीण भागात स्वयंसेवी संस्थाचे मार्फत भटक्या श्वानाचे हल्ल्यावर उपाययोजना शोधल्या जात नाहीत. गावात श्वानाचे संख्याबळ रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतले पाहिजे. जिल्हा प्रशासनाने सहकार्य अपेक्षित आहेत.
असे आहेत जिल्ह्यातील श्वानाची संख्या
भंडारा - २३२८, मोहाडी - १३२१, तुमसर - १६९१, लाखनी - १२५१, साकोली - १३३३, पवनी- १४५९, लाखांदूर - ९७३ असे एकूण १०३५६ आहे.