महामार्गावरील कार्यालयात रस्तेच बनले पार्र्किं ग झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:17 AM2017-07-25T00:17:46+5:302017-07-25T00:17:46+5:30
बेशुमार रहदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्याकडेला दूचाकी वाहनांची पार्र्किं ग होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
नियोजनाचे धिंडवडे : वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बेशुमार रहदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्याकडेला दूचाकी वाहनांची पार्र्किं ग होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तहसिल तथा पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची ही वाहने असून तहसिल कार्यालयात पेड पार्किंगमुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. त्रिमुर्ती चौक परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय व पेट्रोलपंप आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ही सर्व कार्यालय एकमेकांसमोर वसली असल्याने रहदारीत अजून वाढ झाली आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात एका खाजगी इसमाला पेड पार्र्किंग करण्याचा कंत्राट दिले आहे. संबंधित कंत्राटदाराकडून दूचाकी वाहन चालकांकडून दिवसाकाठी दहा रुपये तर चारचाकी वाहन चालकांकडून ४० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या संदर्भात सदर कंत्राटदाराशी विचारणा केली असता, ‘एसडीएम साहेबांनी याबाबत परवानगी दिली आहे. शुल्क वसुल करण्याबाबत सक्ती करु शकत नाही’, असे सांगितले.
अपघाताची शक्यता
तहसील कार्यालय परिसर प्रशस्त आहे. लहान मोठ्या कामांसाठी अनेक लाभार्थ्यांसह विद्यार्थी व पालक येथे येत असतात. तहसील कार्यालयाच्या महामार्गाला लागून असलेले मुख्य प्रवेशद्वार तुटलेल्या स्थितीत आहेत. अश्या स्थितीत अर्जनविस बसत असलेल्या ठिकाणाहून ते कार्यालय परिसरात वाहन पार्किंग करायचे असेल तर शुल्क द्यावे लागते. मात्र शुल्क न देणारे वाहन चालक सदर वाहने महामार्गावरच पार्र्किंग करीत असतात. आधीच महामार्गाचे विस्तारीकरण झालेले नाही. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीकडे वाहतूक शाखेने किंवा तहसील कार्यालय प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणी जोर धरु लागली आहे.