भीमशक्ती संघटनेला बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:33 PM2018-01-14T23:33:58+5:302018-01-14T23:34:19+5:30

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रामाणिक, निष्ठावान व स्वाभीमानी अनुयायांनी आपसातील हेवेदावे विसरुन भीमशक्ती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रीत येऊन ....

Strengthen the Bhimashakti organization | भीमशक्ती संघटनेला बळकट करा

भीमशक्ती संघटनेला बळकट करा

Next
ठळक मुद्देचंद्रकांत हंडोरे : सानगडी येथे संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा

आॅनलाईन लोकमत
साकोली : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रामाणिक, निष्ठावान व स्वाभीमानी अनुयायांनी आपसातील हेवेदावे विसरुन भीमशक्ती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रीत येऊन खांद्याला खांदा लावून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय समस्या सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करावा. सर्वांचे प्रेरणास्त्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी वंचिताना नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार व न्याय प्रदान करण्यासाठी भीमशक्ती संघटनेला बळकट करण्यास सर्वांनी सहकार्य कराव,े असे आवाहन माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.
सानगडी येथील भीमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. यशवंत मेश्राम, बाबा बन्सोड, राजेंद्र देशभ्रतार, नामदेव पिंपळे, वामन कांबळे, रामचंद्र हुमणे, दादा टेंभुर्णे, प्रा. शेन्डे, मंगेश मेश्राम, कमलेश ऊके, महेश कोचे, हरिदास बोरकर, रविंद्र सोनपिंपळे, हरिचंद्र गेडाम, अंबादास नामदेवे, अजय भुतांगे, पतिराम चव्हाण, प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत हंडोरे म्हणाले, विद्यमान सरकार हे शेतकरी, शेतमजूर, भूमीहिन, कामगार, सुशिक्षीत बेरोजगार शोषित, पिडीत, गोरगरीब नागरिकांच्या विरोधात आहे. या सरकारने आतापर्यंत बहुजन समाजाच्या हितांचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले नाही. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. सबका साथ सबका विकासाच्या नावाखाली सर्वांना वेठीस धरुन बहुजन समाजाचे संविधान दत्त हक्क नाकारुन त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. जातीयवाद वाढवून सामाजिक तेढ निर्माण करुन अराजकता माजविल्या प्रयत्न केला जात असून नागरिकांच्या विश्वासघात केला जात आहे. त्यामुळे बहुजन समाजाच्या विचारवंत नागरिकांनी सम्यक विचार करुन विद्यमान सरकारला जाब विचारुन यापुढे चांगला धडा शिकविण्यास समाजजागृती करावी, असे आवाहन केले. चंद्रकांत हंडोरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भीमशक्ती संघटना ही शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार, भूमिहिन, गोरगरीब शोषित पिडीत नागरिकांच्या संविधानदत्त हक्क अधिकार न्यायासाठी लढणारी एकमेव संघटना आहे. युवकांनी भीम शक्ती संघटनेत सहभागी होऊन एकजुटीने कार्य करावे, असे प्रतिपादन अ‍ॅड. यशवंत मेश्राम यांनी केले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत हंडोरे यांच्यावर विश्वास ठेवून भीमशक्ती चळवळ गतीमान करण्यासाठी जीवाचे रान करतील, अशी ग्वाही भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली. कार्यक्रमासाठी अनिल दहिवले, बाळकृष्ण शेन्डे, दामोधर ऊके, मोरेश्वर लेढारे, हितेंद्र मेश्राम व सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: Strengthen the Bhimashakti organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.